“मुस्लिम को घर नहीं देते”.. या प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईत मिळेना घर… म्हणाला “हा वाद कधी संपणार?”

टीव्ही इंडस्ट्रीमधील एका प्रसिद्ध कपलने एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यासाठी त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अभिनेता हा मुस्लिम असल्याने दोघांनाही मुंबईत घर मिळणे आता कठीण झाले आहे.या अभिनेत्याने त्याला आलेले वाईट अनुभव सांगितले आहेत.

मुस्लिम को घर नहीं देते.. या प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईत मिळेना घर... म्हणाला हा वाद कधी संपणार?
Ali Goni Faces Housing Discrimination
Image Credit source: Instagram
| Updated on: May 07, 2025 | 3:33 PM

सध्या भारत-पाकिस्तानमध्ये असलेला तणाव सर्वांनाच माहित आहे. पण त्याचे पडसाद मात्र काही मुस्लिम कलाकारांना सहन करावे लागत आहेत जे भारतीय टीव्ही इंडस्ट्रीमध्ये गेले कित्येक दिवस प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. त्यातील एक सेलिब्रिटी जोडी आहे ज्यांनी त्यांना आलेला अनुभव सांगत खंत व्यक्त केली आहे.

मुस्लिम धर्माचा असल्याने अभिनेत्याला मुंबईत घर मिळेना 

गेल्या कित्येक वर्षांपासून टेलिव्हिजनच्या माध्यमातून अभिनेत्री आणि या अभिनेत्याची लोकप्रिय जोडी प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मात्र आता या जोडीला मुंबईत घर मिळणे कठीण झाले आहे.कारण अभिनेता हा मुस्लिम धर्माचा असल्या कारणाने. याची खंत त्याने व्यक्त केली आहे.

ही लोकप्रिय जोडी आहे, अली गोनी आणि जास्मिन भसीन.हे दोघेही एक लोकप्रिय टीव्ही जोडपं आहे. दोघेही बऱ्याच काळापासून एकत्र आहेत आणि काही दिवसांपूर्वीच त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. पण घर शोधण्याचा त्यांचा स्ट्रगल अलीने सांगितला आहे. तो मुस्लिम असल्याने त्याला घर कसे देण्यात आले नाही हे त्याने सांगितले आहे. तसेच इतक्या वर्षांपासून मुस्लिम असल्यामुळे त्याला इंडस्ट्रीत काम करताना कधी काही समस्या आल्या आहेत का हे देखील अलीने यावेळी सांगितलं आहे. एका पॉडकास्टमध्ये तो या सर्व विषयांवर मोकळेपणाने बोलला आहे.

अभिनेता नक्की काय म्हणाला?

एका पॉडकास्टमध्ये बोलताना अली म्हणाला, “काश्मिरी असल्याने किंवा मुस्लिम असल्याने मला इंडस्ट्रीत कधीही भेदभावाचा सामना करावा लागला नाही. पण मला घर शोधण्यासाठी खूप त्रास झाला. आजही ते तसेच घडते. मी आणि जास्मिन घर शोधत होतो, पण अनेक लोकांनी आम्हाला नकार दिला आणि म्हटलं की ते मुस्लिमांना घरे देत नाहीत. असे म्हणणारे बहुतेक लोक वृद्ध होते”


इंडस्ट्रीमध्ये नक्की कशी वागणूक मिळाली?

यावेळी, अभिनेत्याने इंडस्ट्रीबद्दलही सांगितले की, “संघर्ष होता आणि आताही संघर्ष आहे, आपल्याला खूप निराशेचा सामना करावा लागतो. ऑडिशन प्रक्रियेपासून ते शोमध्ये कास्टिंगपर्यंत आम्हाला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागतं. आजकाल लोक सोशल मीडियाद्वारे रील्स बनवून प्रसिद्ध होतात. कधीकधी कास्टिंग डायरेक्टर आपल्याकडे दुर्लक्ष करतात तेव्हा आपण स्वतःवरही शंका घेऊ लागतो. पण मला इंडस्ट्रीकडून खूप पाठिंबा मिळाला आहे. विशेषतः एकता कपूरने मला बालाजीच्या प्रत्येक शोमध्ये टिकवून ठेवले आहे. पण संघर्ष कधीच संपणार नाही.”

अली सध्या ‘लाफ्टर शेफ 2’ या शोमध्ये दिसत आहे. त्याला या शोमध्ये खूप पसंतही केलं जात आहे. त्याच वेळी, चाहते बऱ्याच काळापासून अली आणि जास्मिनच्या लग्नाची वाटही पाहत होते. पण दोघांचाही सध्या लग्नाचा कोणताही विचार नाही. सध्या त्यांनी एकत्रित राहण्याचा म्हणजेच लिव्ह-इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे.