AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘शूटिंग सोडून स्तनपान करायला…’, लेकीच्या जन्मानंतर आलिया भट्ट हिचं मोठं वक्तव्य

Alia Bhatt : व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत आलिया कशी करते लेकीचा सांभाल? नुकताच झालेल्या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, 'शूटिंग सोडून स्तनपान करायला...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आलिया भट्ट हिच्या वक्तव्याची चर्चा...

'शूटिंग सोडून स्तनपान करायला...', लेकीच्या जन्मानंतर आलिया भट्ट हिचं मोठं वक्तव्य
| Updated on: Nov 24, 2023 | 7:06 PM
Share

मुंबई | 24 नोव्हेंबर 2023 : अभिनेत्री आलिया भट्ट गेल्या काही दिवसांपासून तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. गेल्या वर्षी आलिया हिने लेकीला जन्म दिला. आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर कायम लेक राहा यांच्याबद्दल बोलताना दिसतात. नुकताच आलिया बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये पोहोचली होती. तेव्हा आलिया हिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठे खुलासे केले. एवढंच नाही तर आलिया आणि रणबीर त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून लेकीचा सांभाळ करतात याबद्दल देखील आलिया हिने मौन सोडलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आलिया आणि रणबीर यांची लेक राहा कपूर हिच्याबद्दल चर्चा रंगत आहे.

कॉफी विथ करण शोमध्ये आलिया म्हणाली, जेव्हा अभिनेत्री ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ सिनेमाची शुटिंग सुरु होती, तेव्हा आलिया तिच्या लेकीसोबत काश्मीर याठिकाणी शुटिंग सुरु होती. सिनेमाची शुटिंग सुरु असताना आलिया हिला सतत लेकीला स्तनपान करायाल जावं लागायचं म्हणून आलिया शुटिंग सोडून राहा हिला स्पनपान करायला जायची..

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘मी पूर्णपणे त्रस्त झाली होती. मला काय करावं कळत नव्हतं… तेव्हा मी रणबीर याला फोन केला आणि त्याला सांगितलं हे सगळं सांभाळणं फार कठीण आहे….’ आलिया हिला येत असलेल्या अडचणी रणबीर याला कळल्यानंतर रणबीर काश्मीरमध्ये गेला आणि लेकीला सांभाळण्याची जबाबदारी अभिनेत्याने घेतली.

‘कॉफी विथ करण’ शोमध्ये आलिया हिने तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल अनेक महत्त्वाच्या गोष्टी चाहत्यांसोबत शेअर केल्या. सांगायचं झालं तर आलिया सध्याच्या घडीची लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात.

सोशल मीडियावर देखील आलिया हिने अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर आलिया हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी देखील आलिया स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते अभिनेत्रीच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

Follow Us
दिमागी नक्षलवाद: सोशल मीडियावर नवीन ट्रेंड, लाखोंनी केले फॉलो
दिमागी नक्षल पार्टीचा सोशल मीडियावर धुमाकूळ: पंतप्रधानांच्या शब्दातून झालेली ऑनलाईन चळवळ
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांना दिले तातडीचे निर्देश... झारखंड विद्यार्थी
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांना दिले तातडीचे निर्देश... झारखंड विद्यार्थी आंदोलनावर अखेर राहुल गांधींनी सोडलं मौन
दिल्लीत राजकीय हालचालींना वेग! CM फडणवीस आणि पंतप्रधानांच्या भेटीत...
दिल्लीत राजकीय हालचालींना वेग! CM फडणवीस आणि पंतप्रधानांच्या भेटीत नेमकं काय घडलं? मोठी अपडेट समोर
मोठी बातमी! मनोज जरांगेंचे वडील त्यांच्या भेटीसाठी रुग्णालयात दाखल;
मोठी बातमी! मनोज जरांगेंचे वडील त्यांच्या भेटीसाठी रुग्णालयात दाखल; लेकाची प्रकृती खालावल्याचं कळताच...
नाशिकमधील जीवघेण्या खड्ड्यांमुळे ठाकरे सेनेचा महापालिकेवर भव्य मोर्चा
नाशिकमधील जीवघेण्या खड्ड्यांमुळे ठाकरे सेनेचा महापालिकेवर भव्य मोर्चा
चाळणी झालेल्या रस्त्यांवर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन; नाशिककरांसाठी..
चाळणी झालेल्या रस्त्यांवर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन; नाशिककरांसाठी संजय राऊत मैदानात, पहा व्हिडीओ
ज्याची भीती तेच... महाराष्ट्रातदेखील बिहार सारखं होणार, SIR बाबत
ज्याची भीती तेच... महाराष्ट्रातदेखील बिहार सारखं होणार, SIR बाबत बड्या नेत्याचा धक्कादायक दावा
मराठा आरक्षण आंदोलन: मनोज जरांगेंची ५८ लाख कुणबी प्रमाणपत्रांची मागणी
मराठा आरक्षणावर जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख कुणबी प्रमाणपत्रांची मागणी, सत्ता जाण्याची शक्यता
तुमचं सरकार पाडणार, मराठ्यांचा तळतळाट... मनोज जरांगे काडाडले,
तुमचं सरकार पाडणार, मराठ्यांचा तळतळाट... मनोज जरांगे काडाडले, पुर्ण 58 लाख...
रस्त्याच्या दुरवस्थेचा व्हिडिओ बनवणाऱ्या मुली राज ठाकरेंच्या भेटीला
रस्त्याच्या दुरावस्थेचा व्हिडिओ बनवणाऱ्या मुली राज ठाकरेंच्या भेटीला