आलिया भट्टचा पुन्हा नको तो फेक व्हिडीओ व्हायरल, संताप व्यक्त करत नेटकरी म्हणाले, ‘हे भयानक’

Alia Bhatt | आलिया भट्ट हिचा नको तो व्हिडीओ पुन्हा व्हायरल, व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक व्यक्त केला संताप, नेटकरी म्हणाले, 'हे भयानक', व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आलिया भट्ट हिच्या व्हायरल व्हिडीओची चर्चा...

आलिया भट्टचा पुन्हा नको तो फेक व्हिडीओ व्हायरल, संताप व्यक्त करत नेटकरी म्हणाले, हे भयानक
आलिया भट्ट
| Updated on: Jun 15, 2024 | 1:36 PM

बॉलिवूडमध्ये सध्या डीपफेक व्हिडीओचा मुद्दा तापलेला आहे. काही दिवसांपूर्वी रश्मिका मंदाना, कतरिना कैफ, आलिया भट्ट यांसारख्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रींचा डीपफेक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. ज्यामुळे सर्वत्र खळबळ देखील माजली होती. आता पुन्हा अभिनेत्री आलिया भट्ट हिचा डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अभिनेत्रीचा फेक व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. सध्या सर्वत्र आलिया हिच्या फेक व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

आलिया भट्ट हिचा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फेक व्हिडीओ AI च्या मदतीने तयार करण्यात आला आहे. व्हिडीओला आतापर्यंत 20 मिलियनपेक्षा अधिक लोकांनी पाहिलं आहे. व्हिडीओमध्ये आलिया काळ्या ड्रेसमध्ये दिसत आहे. व्हिडीओमध्ये आलिया तयार होताना दिसत आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांनी संताप आणि चिंता व्यक्त केली आहे.

 

 

व्हिडीओ पाहिल्यानंतर एक नेटकरी म्हणाला, ‘पहिल्यांदा पाहिल्यानंतर मला वाटलं आलिया भट्ट आहे. नीट पाहिल्यानंतर आलिया नसल्याचं कळलं…’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘AI प्रचंड भयानक आहे.’ व्हायरल होत असलेल्या डीपफेक व्हिडीओवर नेटकरी संताप व्यक्त करत आहेत.

याआधी देखील आलिया हिचा डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला होता. त्याआधी अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांत देखील तक्रार दाखल केली होती. शिवाय असं कृत्य करणाऱ्यांनी शिक्षा झालीच पाहिजे असं ट्विट महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील केलं होतं.

आलिया हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री सध्या ‘जिगरा’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमाता पोस्टर देखील जारी करण्यात आला. सिनेमा 11 ऑक्टोबर 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे. आलिया फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाहीतर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.

आलिया भट्ट कायम लेक राहा कपूर हिच्यामुळे देखील चर्चेत असते. राहा हिची एक झलक पाहाण्यासाठी चाहते उत्सुक असतात. अनेकदा राहा हिला आलिया आणि रणबीर कपूर यांच्यासोबत स्पॉट करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर देखील त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.