AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raha Kapoor : आजोबा ऋषी कपूर यांच्या कडेवर राहा कपूर? फोटो पाहून चाहते भावूक

Raha Kapoor : आजोबा ऋषी कपूर यांच्या कडेवर राहा कपूर? आलिया हिच्या आईने पोस्ट केलेला फोटो प्रचंड खास, 'तो' फोटो पाहून चाहते भावुक... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त राहा कपूर आणि ऋषी कपूर यांच्या फोटोची चर्चा...

Raha Kapoor : आजोबा ऋषी कपूर यांच्या कडेवर राहा कपूर? फोटो पाहून चाहते भावूक
| Updated on: Feb 11, 2024 | 3:52 PM
Share

मुंबई : 11 फेब्रुवारी 2024 | चाहत्यांमध्ये कायम स्टारकिड्सची चर्चा रंगलेली असते. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांची लेक राहा कपूर तुफान चर्चेत चर्चेत आहे. सोशल मीडियावर देखील राहा हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता देखील राहा हिचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये राहा आजोबा ऋषी कपूर यांच्या कडेवर दिसत आहे. सोशल मीडियावर नातीसोबत ऋषी कपूर यांचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त राहा आणि ऋषी यांच्या फोटोची चर्चा रंगली आहे.

नुकताच, आलिया भट्ट हिच्या आई आणि अभिनेत्री सोनी राजदान यांनी इन्स्टाग्राम स्ट्रोरीवर एक फोटो पोस्ट केले आहे. फोटोमध्ये राहा आजोबा ऋषी कपूर यांच्या कडेवर दिसत आहे. सांगाचयं झालं तर, फोटोमध्य राहा आणि ऋषी दोघांचे फोटो एडिट करण्यात आले आहेत. सोनी राजदान यांनी आनंद व्यक्त करत कॅप्शनमध्ये, ‘प्रचंड चांगली एडिटींग आहे, ज्यामुळे आम्हाला प्रचंड आनंद झाला आहे…’

नातीचा आजोबांसोबत खास फोटो पोस्ट करत सोनी राजदान यांनी लेक आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि रिद्धिमा कपूर साहनी यांना देखील टॅग केलं आहे. सोशल मीडियावर सर्वत्र राहा हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. चाहते देखील फोटोंवर लाईक्स आणि केमेंटचा वर्षाव करत आनंद व्यक्त करत आहेत.

गेल्या वर्षा आलिया हिने लेकीला जन्म दिला. 6 नोव्हेंबर 2022 मध्ये आलिया आणि रणबीर कपूर यांनी मुलगी राहा हिचं स्वागत केलं होतं. त्यानंतर दोघांनी आपल्या बाळाचा चेहरा रिविल न करण्याचा निर्णय घेतला होता. ख्रिसमस 2023 मध्ये दोघांनीही लेक राहा हिचा चेहरा जगाला दाखवला. आलिया – रणबीर कायम राहा हिच्याबद्दल बोलताना दिसतात.

ऋषी कपूर निधन

ऋषी कपूर आज जगात नसले तरी, त्यांच्या बद्दल कायम चर्चा रंगत असतात. एवढंच नाहीतर, त्यांचे सिनेमे देखील चाहते तितक्याच आवडणीने पाहातात. ऋषी कपूर यांचं निधन 29 एप्रिल 2020 मध्ये झालं. त्यांच्या निधनानंतर चाहते आणि सेलिब्रिटींना फार मोठा धक्का बसला होता.

Follow Us
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजभाषा...
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; वाशीत राजभाषा संमेलनाचा थाट!
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत...
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत मोठी नावे
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत, खास काय?
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
Ganpati Bappa Morya | मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजीरवाडी मंडळात दर्शन
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती