
सध्या बॉलिवूडमध्ये टॉप अभिनेत्रींपैकी एक असलेली अभिनेत्री म्हणजे आलिया भट्ट. आलिया भट्ट संपत्तीच्याबाबतीतही अनेक अभिनेत्रींना टक्कर देते. रिपोर्ट्सनुसार, आलीया 550 कोटींची संपत्ती आहे. पण आलिया एका गोष्टासाठी नेहमीच चर्चेत राहते ती म्हणजे तिचा लूक, तिच्या कपड्यांची स्टाईल. आलिया भट्ट कोणत्या ना कोणत्या पार्टीत तिचे आउटफिट्स हे आधी वापरलेले किंवा कोणत्या इव्हेंटमध्ये घातलेले असतात,तेच पुन्हा वापरते.
आलियाला तिचे आऊटफिट पुन्हा घालायला आवडतात
जिथे सेलिब्रिटी एखाद्या कार्यक्रमात घातलेले कपडे पुन्हा घालणे टाळतात तिथे मात्र आलियाचं मत पूर्णपणे वेगळं आहे. आलियाला तिचे आऊटफिट पुन्हा घालायला आवडतात. अगदी तिच्या लग्नाच्या साडीपासून ते तिच्या हळदीच्या लेहग्यांपर्यंत. ती नेहमी तिचे आउटफिट पुन्हा पुन्हा वापरताना दिसते. जसं की 2023 मध्ये, आलियाने राष्ट्रीय पुरस्कार मिळवण्यासाठी लग्नाची साडी नेसली होती. त्यानंतर तिने 2024 मध्ये मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत तिचा एक ड्रेस पुन्हा एकदा वापरलेला दिसला होता. आता दिवाळीच्या निमित्ताने तिचा हा व्हिडीओ, फोटो पुन्हा एकदा ट्रेंड करत आहेत.
मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत आलियाने घातला जुना लेहंगा
आलिया भट्ट मनीष मल्होत्राच्या यंदाच्या दिवाळी पार्टीत तिच्या मेहंदीच्या संमारंभातील लेहेंगा घालून आली होती. तिने लेहंगा जरी तोच घातला असला तरी तिने लूक फार वेगळा केला होता. तिने लेहंग्यावर जास्त दागिने न घालात सिपंल एक मोठे कानातले घातलते होते. तसेच हलकासा मेकअप केला होता. तसेच केसांची जास्ता काही हेअरस्टाईल न करता एक साधा बन बांधला होता. पण यातही ती फार आकर्षक दिसत होती. आलियाने विंटेज लेहेंगा घातला आणि तरीही तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिला पाहणाऱ्या प्रत्येकाने तिचे कौतुक केले.
आलियाने तिच्या मेहंदीच्या समारंभातील लेहंगा घातला
आलियाने एप्रिल 2022 मध्ये मनीष मल्होत्राने डिझाइन केलेल्या तिच्या मेहंदी समारंभासाठी हा गुलाबी लेहेंगा घातला होता. त्यात 180 कापडाचे पॅचेस वापरले होते. काश्मिरी आणि चिकनकारी धाग्याचे काम असलेले हे लेहेंगा पूर्ण करण्यासाठी 3000 तास लागले. आलियाने हा सुंदर लेहेंगा क्रॉप केलेल्या चोळीसोबत जोडला. लेहेंग्यावर जरी आणि सिक्विन वर्कसह सुंदर भरतकामाचे पॅचेस आहेत. चोळी खऱ्या सोन्या-चांदीच्या भरतकामाने आणि कोरा फुलांनी सजवलेली आहे.
नेटकऱ्यांकडून आलियाचे कौतुक
आलियाने तिच्या मेहंदीसाठी मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला लेहेंगा घातला होता. तो लेहेंगा नक्कीच जुना होता, पण आलियाने ज्या आत्मविश्वासाने तो लेहंगा तिने घातला होता त्यामुळे तिचे कौतुक झाले. तसेच नेटकऱ्यांनी ही यावर बरेच कमेंट्स केल्या आहेत आणि तिचे कौतुकही केले आहे.