AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zaheer Alam : ‘तुम तो ठहरे परदेसी साथ क्या..’ या सुपरहिट गाण्याचे गीतकार जहीर आलम काळाच्या पडद्याआड

1990 च्या दशकातील सर्वात हिट गाण्यांपैकी एक असलेल्या 'तुम तो ठहरे परदेसी साथ क्या निभाओगे' या गीताचे गीतकार जहीर आलम याचे नागपुरात निधन झाले.

Zaheer Alam : 'तुम तो ठहरे परदेसी साथ क्या..' या सुपरहिट गाण्याचे गीतकार जहीर आलम काळाच्या पडद्याआड
Zaheer Alam
| Updated on: May 11, 2026 | 3:45 PM
Share

1990 च्या दशकात एका गाण्याने प्रेक्षकांना वेड लावलेलं. ते गाण होतं, ‘तुम तो ठहरे परदेसी साथ क्या निभाओगे’. अल्ताफ राजा यांच्या आवाजातील हे गाण 90 च्या दशकात अनेकांच्या ओठांवर होतं. त्यावेळच्या तरुण पिढीने हा गाणं डोक्यावर घेतलं होतं. प्रियकर-प्रेयसीच्या भावनांवर हे गाणं होतं. या गाण्याची त्या काळात प्रचंड क्रेझ होती. या गाण्याचे गीतकार जहीर आलम यांचं आज निधन झालं आहे. ते नागपुरात वास्तव्याला होते. जहीर आलम नागपूरच्या मोमीनपुरा या वस्तीतील एका छोट्याशा घरात वास्तव्यास होते. त्यांचे जीवन संघर्षात आणि आर्थिक विवंचनेत गेले. गेल्या काही वर्षांपासून ते नागपूरकारांच्या विस्मरणात गेले होते.

‘तुम तो ठहरे परदेसी साथ क्या निभाओगे’ हे गीत सुरुवातीला स्थानिक स्तरावर गायले जात होते. त्यानंतर त्याला अल्ताफ राजा यांनी गायल्यानंतर हे गीत अजरामर झाले. त्यांच्या या सदाबहार गाण्याने अनेकांचा फायदा झाला. मात्र,त्यांची झोळी रिकामीच राहिली.

पण तसं घडलं नाही

‘तुम तो ठहरे परदेसी साथ क्या निभाओगे’ या गाण्यावर अल्बम काढणाऱ्या कंपनीने, गायकाने भरपूर पैसा कमावला. पण या गाण्याचे गीतकार जहीर आलम यांच्या वाट्याला मात्र कष्टच आले. खरंतर या गाण्याने त्यांच्या आयुष्यातील आर्थिक विंवचना संपायला हव्या होत्या. पण तसं घडलं नाही. हे गीत त्यांनी बनवलं. पण त्यांच्या वाट्याला उपेक्षा, कष्ट आले. ते एम्प्रेस मिलमध्ये नोकरीला होते. पण ही मिल नंतर बंद पडली. त्यानंतर त्यांच्या आयुष्यातील कष्टप्रद प्रवास सुरु झाला.

कव्वाली म्हणून हे गाणं गायलं जायचं

आधी कव्वाली म्हणून हे गाणं गायलं जायचं. पण अल्ताफ राजा यांनी म्युझिक अल्बममध्ये हे गाणं गायल्यानंतर रातोरात हिट झालं. चहाची टपरी, रिक्षा इथे हे गाणं वाजू लागलं. गीतकार म्हणून त्यांना मात्र अल्प मानधन मिळालं.

त्यामुळे जहीर आलम यांचं नाव समोर आलं नाही

गीतकार जहीर आलम यांनी एका चित्रपटासाठी लिहिलेलं गाण खूप गाजलं. पण चित्रपटातील इतर गाणी दुसऱ्या नामवंत गीतकाराची होती. त्याने गीतकार म्हणून फक्त माझेच नाव जाईल अशी अट घातलेली. त्यामुळे जहीर आलम यांचं नाव समोर आलं नाही. त्यांना फक्त 3 हजार रुपये मानधनावर समाधान मानावं लागलं.

Follow Us
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी सांगितला मास्टर प्लॅन
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल...
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?