AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

14 हजार 900 कॅप्सूल लोकांनी खाल्ल्या असत्या तर… मुंबईत काय घडलं असतं? पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती

Poison Capsules Case : मुंबईत जेजे आणि भायखळा परिसरातून मोहरमची मिरवणूक जात असताना एक व्यक्ती लोकांना कॅप्सूल देत असल्याचे समोर आले आहे. आता याबाबत पोलिसांनी धक्कादायक माहिती दिली आहे.

14 हजार 900 कॅप्सूल लोकांनी खाल्ल्या असत्या तर... मुंबईत काय घडलं असतं? पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती
poison capsules caseImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jun 27, 2026 | 7:29 PM
Share

मुंबई पोलिसांनी मोहरम मिरवणुकीदरम्यान कथितरीत्या विषारी कॅप्सूल वाटप करण्याचा मोठा कट उधळून लावला आहे. या प्रकरणात फैयाज प्रेमजी नावाच्या एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीने कोणतीही अधिकृत परवानगी न घेता वेदनांपासून आराम मिळेल असं म्हणत लोकांना कॅप्सूल वाटत आणि विकत होता. जेजे आणि भायखळा परिसरातून मोहरमची मिरवणूक जात असताना आरोपी लोकांना हे कॅप्सूल वितरित करत असल्याचे आढळले आहे. आता या कॅप्सूल्सबाबत पोलिसांनी मोठी माहिती दिली आहे.

पोलिसांनी काय म्हटले?

या घटनेबाबत बोलताना झोन 1 मुंबईचे पोलीस उपायुक्त जयंत मीना यांनी म्हटले की, ‘काल रात्री भायखळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुस्लिम समुदयाच्या मोहरमच्या मिरवणुकीत एक इसम पेन रिलीफ सारख्या दिसणाऱ्या कॅप्सूल मोफत वाटप करत होता. त्यावर पोलिसांना संशय निर्माण झाला आणि त्याच्याकडे कुठलीही परवानगी नसल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. त्याच्याकडील कॅप्सूल्स जप्त करुन त्याची चौकशी सुरू केली.

संशयीताची परदेशवारी

चौकशी सुरू असताना सलमान सय्यद नावाच्या व्यक्तीची कॅप्सूल खाऊन तब्बेत बिघडली असल्याची तक्रार पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांचा संशय अधिक वाढला आणि त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने धक्कादायक माहिती दिली. ताब्यात घेतलेल्या इसमाच नाव फय्याज प्रेमजी आहे, तो पुण्याच्या विमाननगर याठिकाणी राहतो. त्याने BBA केलेलं आहे, तो इराण आणि इराकला जाऊन आलेला आहे.

14 हजार 900 कॅप्सूल जप्त

फय्याज निसार प्रेमजीची अधिक चौकशी केली असता असे समजले की, मोहरमच्या मिरवणुकीत मोफत कॅप्सूल वाटप करुन नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा त्याचा उद्देश होता. वाटप करत असलेल्या कॅप्सूल मध्ये त्याने झिंक फॉसफईड नावाचा विषारी पदार्थ मिसळला होता. त्याच्याकडून 14 हजार 900 कॅप्सूल पोलिसांनी जप्त केल्या आहेत, एका कॅप्सूल मध्ये तो एक ग्रॅम झिंक फॉसफईड टाकत होता.

मोठा धोका टळला

पुढे बोलताना पोलिसांनी सांगितले की, ’30 हजार रिकामी कॅप्सूलची त्याने ऑर्डर केली होती, 50 किलो झिंक फॉसफईडची ऑर्डर केली होती. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा धोका टळला आहे. त्याची सखोल चौकशी सुरु आहे. घटनेचा तपास सुरु आहे, आणखीन काही माहिती लवकरच समोर येईल. दरम्यान, जर ही कॅप्सूल्स 14 हजार 900 लोकांनी खाल्ल्या असत्या तर त्यांचीही तब्ब्येत खराब होऊन काही बरं वाईट झालं असतं अशी माहिती समोर आली आहे.

Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत