
Ameesha Patel Pregnancy Rumours: ‘गदर’, ‘गदर 2’, ‘रेस 2’, ‘कहो ना प्यार है’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत अभिनेत्री अमीषा पटेल हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण आता अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर आहे. पण अमीषा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता देखील अमीषाने स्वतःचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहे. फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला देखील धक्का बसेल. सध्या सर्वत्र अमीषाच्या नव्या फोटोंची चर्चा रंगली आहे. फोटोमध्ये अमीषाने बिकिनी घातली आहे. पण अभिनेत्रीच्या फिटनेसने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
कायम फिटनेसमुळे चर्चेत असणारी अमीषा आता गरोदर असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. अमीषा पटेलने शुक्रवारी तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे फोटो शेअर केले. ज्यामध्ये ती हिरव्या रंगाचा स्विमसूट घालून पोज देताना दिसत आहे. यासोबतच तिने पांढरा शर्ट, डोळ्यावर चष्मा आणि टोपी घातली आहे. फोटोमध्ये अभिनेत्री पोट पाहून आमीषा गरोदर असल्याच्या चर्चा चाहत्यांमध्ये रंगल्या आहेत.
अमीषाचे फोटो आणि सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यावर नेटकरी कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. एक नेटकरी म्हणाला, ‘प्रेग्नेंट…? तू आई होणार आहेस का?’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘अभिनंदन आई…!’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘पण बाप कोण आहे…’ यावर आमीषाने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही.
फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये ‘दुबई… सूर्यप्रकाश आणि माझी वेळ…’ असं लिहिलेलं आहे. आमीषा पटेल सध्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे. आता अभिनेत्री बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.
आजही चाहत्यांमध्ये अमीषाची क्रेझ पाहायला मिळते. अमीषा हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीचं नाव अनेकांसोबत जोडण्यात आलं पण कोणत्याच सेलिब्रिटीसोबत अमीषाचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. आज वयाच्या 49 व्या वर्षी देखील अमीषा एकटीच आयुष्य जगते.