वडिलांच्या निधनानंतर अमिताभ बच्चन आणि भावामध्ये आला दुरावा, कुठे आहे बिग बींच्या भावाचं कुटुंब?
Amitabh Bachchan Brother: वडिलांच्या निधनानंतर असं काय झालं, ज्यामुळे अमिताभ बच्चन भावासोबत कधीच दिसत नाही, काय करतात बिग बींचे भाऊ, अमिताभ बच्चन यांचं कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असतं चर्चेत...

Amitabh Bachchan Brother: अमिताभ बच्चन यांना आज कोणत्याच वेगळ्या ओळखीची गरज नाही. आतापर्यंत त्यांनी अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावली आणि चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज बिग बी यांच्यामुळे बच्चन कुटुंब बॉलिवूडमधील प्रतिष्ठित कुटुंबापैकी एक आहे. आज अमिताभ बच्चन यांना कोणी ओळखत नाही असं कोणी नाही. पण बिग बी यांच्या लहान भावाबद्दल फारसं कोणाला माहिती देखील नसेल… बिग बी यांच्या लहान भावाचं नाव अजिताभ बच्चन असं आहे… एकदा स्वतः अमिताभ बच्चन यांनी लहान भावाबद्दल सांगितलं होतं.
लहान भावाबद्दल अमिताभ बच्चन म्हणाले होते, ‘ भावंडांमध्ये जो कोणी लहान असतो, कुटुंबामध्ये प्रत्येक जण त्याच्यासाठी काळजी करत असतो. त्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य मिळून त्याचा सांभाळ करतो.’ पण अमिताभ बच्चन यांच्यासाठी लहान भाऊ एका मोठ्या भावासारखा आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामागे कारण देखील तसं आहे.
बिग बी म्हणाले, ‘अभिनेता म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्याचा सल्ला मला माझ्या लहान भावाने मला दिला. त्याने माझा फोटो एका स्पर्धेसाठी पाठवून दिला होता. तेव्हा माझी निवड झाली नाही. पण अभिनेता होण्याचं स्वप्न माझ्या मनात घर करुन गेलं… अभिनेता होण्याच्या नादात मी माझी नोकरी सोडली…’ आज बिग बी बॉलिवूडचे महानायक आहेत आणि आजपर्यंत त्यांची जागा कोणी घेवू शकलं नाही..
वडील हरिवंश राय बच्चन यांच्या निधनानंतर दोन भावांमधील अंतर वाढलं?
यावर खुद्द अजिताभ बच्चन यांनी मोठा खुलासा केला होता. अजिताभ आणि अमिताभ यांच्यामध्ये दुरावा आला होता आणि वडील हरिवंशराय बच्चन यांच्या निधनानंतर दुराला आणखी वाढला… एका मुलाखतीत अजिताभ म्हणाले, त्यांच्या आणि अमिताभ यांच्यात खोलवर मतभेद होते, जे त्यांचे वडील हरिवंश राय बच्चन यांच्या निधनानंतर आणखी वाढले.
अजिताभ बच्चन म्हणाले, ‘मी गेल्या अनेक वर्षांपासून परदेशात राहत आहे. दूर राहिल्यामुळे नात्यात आणखी दुरावा येतो. वडील जिवंत असताना अमिताभ आणि मला त्यांना दुखवायचे नव्हतं. म्हणून आम्ही त्यांच्यासाठी एकत्र राहण्याचा प्रयत्न केला आणि बराच वेळ एकत्र घालवला. ‘
अजिताभ यांच्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर, त्यांना चार मुलं आहेत. त्यांच्या मुलांची नावे नयना बच्चन, भीम बच्चन, निलिमा बच्चन आणि नम्रता बच्चन अशी आहेत. बच्चन कुटुंबाची चर्चा कायम रंगत असते.
