
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांची माफी मागितली आहे. सांगायंच झालं तर, ‘कोन बनेगा करोडपती 19’ या शोचे होस्ट अमिताभ बच्चन त्या एपिसोडनंतर सर्वत्र चर्चेत आहे. ज्यामध्ये केबीसी ज्यूनियरमध्ये आलेल्या एका मुलाने उद्धटपणा केला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी मुलाचं समर्थन केलं तर, अनेकांनी मुलाच्या संस्कारांवर प्रश्नचिन्ह निर्माण केला… आता अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून सर्वांची माफी मागितली आहे.
सर्वांना वाटत आहे की, हे प्रकरण मुलाच्या उद्धटपणा संबंधि आहे. पण असं काहीही नाही. नुकताच अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस झाला. असंख्य चाहत्यांनी अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, पण त्यांचे आभार बिग बी मानू शकले नाहीत. त्यामुळे बिग बी यांनी सर्वांची माफी मागितली आहे…
T 5532 – My apologies first to all that have wished me for the 11th of October, my birthday, and not received a response from me .. my Mobile is suddenly misbehaving and I have not been able to respond ..
My gracious gratitude and affection ❤️🙏 to all pic.twitter.com/2H5zZbVozv— Amitabh Bachchan (@SrBachchan) October 14, 2025
एक्सवर पोस्ट करत अमिताभ बच्चन म्हणाले, ‘सर्वांत आधी तर, मी त्यांची माफी मागेल ज्यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण त्यांचे आभार मी मानू शकलो नाही… माझा मोबाईल अचानक बिघडला, ज्यामुळे मी आभार मानू शकलो नाही… सर्वांसाठी माझं प्रेम…’ सध्या अमिताभ बच्चन यांची पोस्ट सोशल मीडियावर तुफाण व्हायरल होत आहे.
सांगायचं झालं तर, केबीसी ज्यूनियरमध्ये आलेल्या एका मुलाच्या उद्धटपणामुळे अमिताभ बच्चन नाराज आहेत. ज्यामुळे वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी कोणाशीत संपर्क साधला नाही. असं सर्वांना वाटलं होतं. पण असं काहीही नसल्याचं अमिताभ बच्चन यांच्या पोस्टमधून समोर आलं आहे. बिग बी यांचा फोन बिघडल्यामुळे ते सोशल मीडियावर सक्रिय नव्हते.
बिग बी यांच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. एक नेटकर बिग बींच्या पोस्टवर कमेंट करत म्हणाला ‘वाढदिवसाच्या असंख्य शुभेच्छा आल्या असतील म्हणून फोन हँग झाला.’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘काही हरकत नाही सर… गॅझेट कधीकधी बिघडतात…’, बिग बी यांच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.
11 ऑक्टोबर रोजी अमिताभ बच्चन यांनी त्यांचा 83 वा वाढदिवस साजरा केला. वयाच्या 83 व्या वर्षी देखील चाहत्यांमध्ये त्यांची असलेली क्रेझ कमी झालेली नाही. अमिताभ बच्चन फक्त सोशल मीडियावरच नाही तर, मोठ्या पडद्यावर आजही सक्रिय आहेत. अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास, ते रजनीकांत यांच्यासोबत ‘वेट्टाय्यान’ या दाक्षिणात्य सिनेमाच झळकले होते. यानंतर ते ‘कल्की 2898 एडी’च्या सीक्वेलमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.