अमिताभ बच्चन यांची नात नव्या नंदाचा करिअरबाबत मोठा निर्णय, म्हणाली “माझ्या पालकांनी मला शिकवले…”
अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा सध्या तिने निवडलेल्या करिअर पर्यायाबाबत फार चर्चेत आहे. तिने जो पर्याय निवडला आहे तो जाणून नक्कीच सर्वांना थोडं आश्चर्य वाटू शकतं. तिने एका मुलाखती तिला काय करायचं आहे हे तिनेस्पष्ट केलं आहे.

बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या घराबद्दल, घरातील सदस्यांबद्दल नेहमी चर्चा होतच असते. तसेच बच्चन कुटुंबातील प्रत्येकजण बॉलिवूडशी कोणत्याना कोणत्या प्रकारे संबंधित आहे. त्यानंतर आता या घरातील नवीन पढी देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. जसं की श्वेता नंदाचा मुलगा अगस्त्य नंदाने चित्रपसृष्टीत पाऊल ठेवलं आहे. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत ते अमिताभ बच्चन यांची नात नव्या नंदावर. पण एका मुलाखतीत तिने स्वत: तिच्या करीअरबद्दलचा मोठा खुलासा केला आहे. तिला काय करायचं आहे तिने या मुलाखतीत स्पष्ट केलं आहे.
दरम्यान नव्या नवेली नंदा तिच्या बॉलिवूड पदार्पणामुळे आणि एमबीएच्या अभ्यासामुळे अनेकदा चर्चेत असते. पण आता,एका मुलाखतीत नव्याने बॉलिवूडपासून दूर राहून व्यवसाय आणि सामाजिक कार्यात करिअर का करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं.
नव्या नंदाने करिअर म्हणून निवडला हा पर्याय
मुलाखतीत तिला विचारण्या आले की “तू कधी चित्रपटांमध्ये येण्याचा विचार केला आहेस का?” नव्याने प्रामाणिकपणे उत्तर दिले, “नाही, कधीच नाही. मला नेहमीच असे विचारले जाते आणि मला का माहित नाही. मला वाटते की मी नेहमीच अशा पद्धतीने वाढले जिथे माझ्या पालकांनी मला शिकवले की जर तुम्हाला एखाद्या गोष्टीत 100% आवड किंवा आत्मविश्वास नसेल तर ते करू नका. तुम्हाला जे करायचे आहे ते करा. मला ते कधीच करायचे नव्हते. मला नेहमीच माझ्या वडिलांच्या कामात खूप रस होता. ते कामावरून घरी आल्यावर मी त्यांच्याशी याबद्दल बोलायचे, गप्पा मारायचे. मला अभिनयात जायचं नाही.”
View this post on Instagram
अमिताभ बच्चन यांची नात काय करते?
नव्याने स्पष्ट केले की तिची आवड अभिनय नसून इतर गोष्टींमध्ये आहे. ती याबद्दल म्हणाली “मी प्रत्येक गोष्टीचा आदर करते, पण मला कधीही त्याचा भाग व्हायचे नव्हतं. माझे हितसंबंध, माझा आनंद आणि माझी आवड इतरत्र आहे,”. म्हणूनच नव्याने एक व्यावसायिक महिला आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणून स्वतःसाठी एक स्थान निर्माण करण्याचा निर्णय घेतला. ती लिंग समानतेसाठी काम करणारी एक स्वयंसेवी संस्था प्रोजेक्ट नवेली चालवते आणि तिच्या कुटुंबाचा व्यवसाय देखील सांभाळते.
नव्या नंदाचा भाऊ अगस्त्य नंदा मात्र अभिनयाच्या वाटेवर
नव्याचा धाकटा भाऊ म्हणजेच अगस्त्य नंदा मात्र चित्रपटसृष्टीत आला आहे. त्याने झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ या चित्रपटातून पदार्पण केले आहे. ज्यामध्ये सुहाना खान, खुशी कपूर, वेदांग रैना आणि मिहिर आहुजा यांच्यासोबत काम केले होते. तो लवकरच ‘ट्वेंटी वन’ या चित्रपटातही दिसणार आहे.
