AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमिताभ बच्चन यांना नेमकं झालं तरी काय? रुग्णालयात दाखल, प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर

महायनायक अमिताभ बच्चन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही बातमी समोर येताच चाहत्यांनी चिंता व्यक्त करण्यात सुरुवात केली आहे. दरम्यान, त्यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट देखील समोर येत आहे.

अमिताभ बच्चन यांना नेमकं झालं तरी काय? रुग्णालयात दाखल, प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर
अभिनेते अमिताभ बच्चन
| Updated on: May 20, 2026 | 8:04 AM
Share

बॉलिवूडचे महानायक आणि चाहत्यांचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्याबद्दल मोठी अपडेट समोर येत आहे. अमिताभ बच्चन यांनी मुंबई येथील नानावटी रुग्णलयात दाखल करण्यात आलं आहे. बिग बी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं समजताच चाहत्यांनी चिंता व्यक्त करण्यात सुरुवात केली आहे… पण काळजी करण्याचं काहीही कारण नाही. कारण रुग्णालयातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांना रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अमिताभ बच्चन यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे.

अमिताभ बच्चन यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, चाहत्यांसाठी बिग बी फक्त दिग्गज अभिनेते नाहीत तर, एक भावना आहे. लहान मुलांपासून वृद्ध व्यक्ती देखील अमिताभ बच्चन यांचे चाहते आहे. याच कारणामुळे चाहते अमिताभ बच्चन यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. अशात बिग बी देखील चाहत्यांना नाराज करत नाहीत.

अमिताभ बच्चन कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. अमिताभ बच्चन कायम सोशल मीडियावर सक्रिय असतात. ते कायम X अकाउंटवर पोस्ट शेअर करतात आणि चाहत्यांच्या संपर्कात राहतात… चाहते देखील त्यांच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. बिग बी अनेकदा अशा पोस्ट करतात ज्या, लोकांना गोंधळात टाकतात. चाहत्यांनी कळत नाही की, बिग बींना नक्की काय म्हणायचं आहे. 18 मे रोजी त्यांनी X वर पोस्ट केलं , “जेव्हा दोघे लढतात, तेव्हा तिसरा जिंकतो.”

घरातून बाहेर येत चाहत्यांना भेटतात…

अमिताभ बच्चन सोशल मीडियावर सक्रिय तर कायम असतात, पण चाहत्यांना भेटण्यासाठी ते कायम घराबाहेर येऊन काही काळ चाहत्यांसोबत घालवतात… जवळपास प्रत्येक रविवारी अमिताभ बच्चन जलसा बंगल्या बाहेर येतात आणि चाहत्यांना अभिवादन करतात. बिग बींची एक झलक पाहण्यासाठी देखील चाहते उत्सुक असतात.

अमिताभ बच्चन यांच्या फिल्मी करियरबद्दल सांगायचं झालं तर, बिग बींनी असंख्य चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. 1969 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सात हिंदुस्तानी’ सिनेमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आतापर्यंत त्यांनी 200 पेक्षा अधिक सिनेमांमध्ये काम केलं आहे. आज वयाच्या 83 व्या वर्षी देखील अमिताभ बच्चन मोठ्या पडद्यावर सक्रिय आहेत आणि चाहते त्यांच्या नव्या सिनेमाच्या प्रतिक्षेत असतात.

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?