अमिताभ यांना नेमका काय होतोय त्रास? दिवाळीच्या दिवशीच चाहत्यांची माफी, स्वतःच सगळं सांगितलं

महानायक अमिताभ बच्चन यांची प्रकृती ठिक नसल्याची माहिती समोर आलाी होती. त्यानंतर त्यांच्या केबीसी या शोचे शूटही थांबवण्यात आले होते. पण आता दिवाळीनिमित्त बिग बी यांनी स्वतः चाहत्यांना त्यांच्या तब्येतीबद्दल माहिती दिली आहे. नेमकं काय म्हणाले बच्चन?

अमिताभ यांना नेमका काय होतोय त्रास? दिवाळीच्या दिवशीच चाहत्यांची माफी, स्वतःच सगळं सांगितलं
amitabh bachchan health update
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 08, 2026 | 7:23 PM

Amitabh Bachchan Health Update : अमिताभ बच्चन हे गेली अनेक वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. ते ८४ वर्षांचे असून सातत्याने काम करत आहेत. गेल्या दोन दिवसांमध्ये त्यांच्या तब्येतीबद्दलच्या घडामोडी समोर आल्या होत्या. प्रकृती ठिक नसल्याने कौन बनेगा करोडपती या शोचे शूटही थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याबद्दलची माहिती समोर आल्यानंतर अमिताभ यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं होतं. त्यानंतर बच्चन साहेबांची तब्येत नेमकी कशी आहे, त्यांना काय झालं आहे, याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात होते. पण आता या सर्व प्रश्नांचं उत्तर खुद्द बिग बींनीच दिलं आहे.

नेमकं काय म्हणाले अमिताभ?

दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी एक ब्लॉग लिहिला आहे. त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय की लिहण्यासाठी अडचण येत आहे. बच्चन यांनी सांगितलं की, दिवाळीनिमित्त चाहत्यांच्या शुभेच्छा आणि गिफ्ट सर्वकाही मिळत आहे. तुमच्या सर्वांचे गिफ्ट एवढ्या मोठ्या संख्येने येतात की जागा अपूरी पडते. त्यांना योग्य प्रकारे ठेवलं नाही तर त्यांचा कुठेतरी अपमान केल्यासारखं होतं त्यामुळे माझा प्रयत्न असतो की पूर्णपणे ते योग्य प्रकारे हाताळले जावेत. तुम्ही देत असलेल्या शुभेच्छा आणि प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद.

Loading...

अमिताभ यांनी आवर्जुन सांगितलं की, मला स्वतःच्या हाताने लिहून चाहत्यांना धन्यवाद म्हणायचे होते पण हातांनी लिहताना प्रॉब्लेम होत आहे. बच्चन यांनी सर्व फॅन्सना धन्यवाद देतानाच या गोष्टीसाठी माफीही मागितली आहे.

आजकाल माझ्या तोंडून कृपया मला क्षमा करा हे शब्द वारंवार येत आहेत. आता काय करणार? परिस्थितीच अशी निर्माण झाली आहे की, क्षमा मागण्याची वेळ वारंवार येते. क्षमा मागणे कधीही चांगलेच, त्यात काही नुकसान तर नाही, नाही का? समोरची व्यक्ती कदाचित क्षमा स्वीकारण्यास नकार देईल किंवा दुर्लक्ष करेल, किंवा कदाचित त्यांना माझ्या क्षमा मागण्यामागची भावना खरोखर समजेलही. जर त्यांना ती भावना समजली, तर माझे हृदय आनंदाने भरून जाईल; आणि जर नाही समजली, तर कदाचित त्यांचे स्वतःचे मन अस्वस्थ किंवा अशांत राहील, असं बच्चन म्हणाले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us