AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amitabh Bachchan | जया बच्चन यांच्या नकळत बिग बींकडून व्हिडीओ शूट; नेटकरी म्हणाले ‘आता काही खरं नाही’

जया बच्चन यांच्या परवानगीशिवाय कोणीही फोटो किंवा व्हिडीओ शूट करणं त्यांना अजिबात आवडत नाही. यामुळे अनेकदा त्या पापाराझींवर भडकताना दिसतात. मात्र हेच काम आता त्यांचे पती अमिताभ बच्चन यांनी केलं आहे.

Amitabh Bachchan | जया बच्चन यांच्या नकळत बिग बींकडून व्हिडीओ शूट; नेटकरी म्हणाले 'आता काही खरं नाही'
Amitabh and Jaya BachchanImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 07, 2023 | 2:59 PM
Share

मुंबई | 7 सप्टेंबर 2023 : ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन या नेहमी कॅमेरापासून दूरच राहणं पसंत करतात. परवानगीशिवाय फोटो आणि व्हिडीओ काढणाऱ्या पापाराझींना त्या नेहमीच ओरडताना, त्यांच्यावर चिडताना दिसून येतात. त्यांच्या संमतीशिवाय कोणीही फोटो किंवा व्हिडिओ शूट केलेलं त्यांना अजिबात आवडत नाही. मात्र एका व्यक्तीने त्यांच्या परवानगीशिवाय नुकतंच हे काम केलं आहे. ही व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून बॉलिवूडचे महानायक आणि जया बच्चन यांचे पती अमिताभ बच्चन आहेत. बिग बींनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ कुठल्यातरी सेटवरचा असल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन हे त्यांच्या फोनमध्ये व्हिडीओ शूट करताना दिसत आहेत. त्याविषयी आधी जया बच्चन यांना पुसटशीही कल्पना नसते. मात्र जेव्हा त्यांची नजर फोनच्या कॅमेराकडे वळते तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य झळकून येतं.

बिग बींनी पोस्ट केलेल्या या स्लो मोशन व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. जया यांच्या परवानगीशिवाय फक्त अमिताभजीच त्यांचा फोटो किंवा व्हिडीओ शूट करू शकतात, असं अनेकांनी कमेंट्समध्ये म्हटलंय. 6 सप्टेंबर रोजी बिग बींनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. दोघंही एका ब्रँडसाठी एकत्र शूटिंग करत होते. सेटवर दोघं तयार होऊन बसले असताना बिग बींनी हा व्हिडीओ शूट केला. त्यावर सर्वसामान्यांसह अर्चना पूरण सिंह, मौनी रॉय यांसारख्या सेलिब्रिटींकडूनही कमेंट्सचा वर्षाव होत आहे. जया बच्चन नेहमी पापाराझींना ओरडताना दिसतात, मात्र जेव्हा अमिताभ बच्चन त्यांना न विचारता व्हिडीओ शूट करतात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आपसूकच हसू येतं, असंही काहींनी म्हटलंय.

पहा व्हिडीओ

एका युजरने लिहिलं, ‘फक्त अमितजींमध्येच जयाजींना क्लिक करण्याची हिंमत आहे.’ तर दुसऱ्या युजरने म्हटलंय, ‘तुम्ही त्यांना विचारल्याशिवाय व्हिडीओ शूट केला. आता घरी गेल्यानंतर तुमचं काही खरं नाही.’ आणखी एका नेटकऱ्याने लिहिलं, ‘तुमची पत्नी फार क्वचित हसते. तुम्हीच हे संभव करून दाखवलंय.’ जया बच्चन यांना फोटो काढायला आवडत नसल्याची गोष्ट जगजाहीर आहे. त्यांचे रागावतानाचे आणि चिडतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.