अमिताभ बच्चन यांच्या जावयाने जुहूत घेतलं आलिशान घर; किंमत वाचून विस्फारतील डोळे!

अमिताभ बच्चन यांच्या जावयाने मुंबईत आलिशान घर खरेदी केलं आहे. मुंबईतील जुहू परिसरात त्यांनी हे घर खरेदी असून त्याची किंमत पाहून तुमचे डोळे विस्फारतील. याच परिसरात बच्चन कुटुंबीयांचे दोन आणखी बंगले आहेत.

अमिताभ बच्चन यांच्या जावयाने जुहूत घेतलं आलिशान घर; किंमत वाचून विस्फारतील डोळे!
Nikhil Nanda with Shweta and Amitabh Bachchan
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 23, 2025 | 3:16 PM

अभिनेते अमिताभ बच्चन यांचे जावई निखिल नंदा हे लाइमलाइटपासून दूरच राहणं पसंत करतात. परंतु तरीही ते कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येतात. त्यांनी नुकतंच मुंबईतील जुहू परिसरात आलिशान घर खरेदी केल्याची चर्चा आहे. या घराची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. हा तोच परिसर आहे, जिथे बच्चन कुटुंबीयांचा ‘प्रतीक्षा’ आणि ‘जलसा’ हा बंगला आहे. रिअल इस्टेट रिसर्च अँड डेटा अॅनालिटिक्स फर्म ‘लियासेस फोरास’ने दिलेल्या माहितीनुसार, 16 ऑक्टोबर 2025 रोजी या प्रॉपर्टीची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली. निखिल यांची बहीण निताशा नंदा यांच्या माध्यमातून ही खरेदी करण्यात आली. बहिणीनेच पॉवर ऑफ अॅटर्नीच्या रुपात हस्ताक्षर केले आहेत. या अपार्टमेंटची किंमत तब्बल 28 कोटी रुपये असल्याचं समजतंय.

निखिल नंदा हे एस्कॉर्ट्स क्यूबोटा लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. ते सध्या दिल्लीत राहतात. परंतु आत मुंबईत नवीन घर घेतल्यानंतर बच्चन आणि नंदा कुटुंबीय याच शहरात अधिक वेळ एकत्र राहणार असल्याचं कळतंय. विशेष म्हणजे श्वेता आणि निखिल नंदा यांची दोन्ही मुलं मुंबईत त्यांच्या करिअरची सुरुवात करत आहेत. अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाने नुकतंच अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं आहे. तर नव्याचा पॉडकास्ट लोकप्रिय आहे.

निखिल नंदा यांनी घेतलेला अपार्टमेंट 3,139 चौरस फूट परिसरात पसरलेला आहे. त्याचसोबत त्याला 411 चौरस फुटांचा टेरेस एरियासुद्धा देण्यात आला आहे. कागदपत्रांवरील माहितीनुसार, या अपार्टमेंटसोबत निखिल नंदा यांना तीन कार पार्किंग स्पेससुद्धा मिळाली आहे.

निखिल नंदाने 1997 मध्ये श्वेता बच्चनशी लग्न केलं. या लग्नामुळे बॉलिवूडमधील दोन प्रतिष्ठित बच्चन आणि कपूर कुटुंब यांच्यात कायमचा एक धागा जोडला गेला. या दोघांचं लग्न सर्वाधिक चर्चेतल्या लग्नसोहळ्यांपैकी एक होतं. चित्रपट आणि उद्योगक्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्ती या सोहळ्याला उपस्थित होते. निखिल हे ऋतु नंदा आणि राजन नंदा यांचे पुत्र आहेत. दिवंगत अभिनेते राज कपूर यांचे ते नातू आहेत.