KBC 18 : 50 लाख रुपये आणि महिलांच्या अधिकारासंदर्भातला सोपा प्रश्न, पण स्पर्धकाची माघार, तुम्हाला माहितीये उत्तर?

KBC 18 : महानायक अमिताभ बच्चन शोमध्ये विचारण्यात महिलांच्या अधिकारासंदर्भातला प्रश्न आला. पण उत्तर बरोबर आहे की नाही? याच भितीने स्पर्धकाने माघार घेतली. तुम्हाला माहितीये का प्रश्नाचं उत्तर?

KBC 18 : 50 लाख रुपये आणि महिलांच्या अधिकारासंदर्भातला सोपा प्रश्न, पण स्पर्धकाची माघार, तुम्हाला माहितीये उत्तर?
अभिनेते अमिताभ बच्चन
| Updated on: Aug 16, 2026 | 9:09 AM

KBC 18 : ‘कोण बनेगा करोडरती’ शोच्या 18 व्या पर्वाला जोरदार सुरुवात झाली आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन पुन्हा आपल्या दमदार आवाजात “देवी आणि सज्जनांनो…” म्हणत स्पर्धकांचं स्वागत करत आहेत. प्रश्न – उत्तरांच्या या खेळात काही स्पर्धत मोठी रक्कम घरी घेऊन जातात, तर अचूक उत्तर माहिती नसल्यामुळे काही स्पर्धकांना माघार घ्यावी लागते. आता देखील असंच काही झालं आहे. नुकताच पार पडलेल्या KBC च्या एका एपिसोडमध्ये हॉटसीटवर बसलेल्या डॉ. जागृती अग्रवाल 14 व्या प्रश्नापर्यंत पोहोचल्या. पण महिलांच्या अधिकारासंदर्भातलं एका प्रश्नाचं उत्तर कठीण वाटत असल्यामुळे त्यांनी कोणताही धोन न पत्कारता खेळ सोडण्याचा निर्णय घेतला…

महिलांच्या अधिकारासंदर्भातला 50 लाख रुपयांचा प्रश्न…

डॉ. जागृती अग्रवाल यांना अमिताभ बच्चन यांनी महिलांच्या अधिकारासंदर्भातला 14 वा प्रश्न विचारलेला. तो प्रश्न होता, ‘1910 मध्ये कोपनहेगन यााठिकाणी आयोजित ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑफ वर्किंग वुमन’ मध्ये ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ साजरा करण्याची संकल्पना कोणी मांडली होती?’, या प्रश्नासाठी बिग बींनी दिलेले पर्याय खालील प्रमाणे होते.

A) जेन ॲडम्स (Jane Addams)

B) एमेलीन पॅंकहर्स्ट (Emmeline Pankhurst)

C) रोझा लक्झमबर्ग (Rosa Luxemburg)

D) क्लारा जेटकिन (Clara Zetkin)

शोमध्ये स्पर्धकाला काही लाईफ लाईन वापरण्यास दिल्या जातात. पण डॉ. जागृती अग्रवाल यांच्या सर्व लाईफ लाईन संपल्या होत्या. त्यामुळे उत्तर बरोबर असून देखील त्यांनी खात्री नव्हती. अशात चुकीचं उत्तर दिलं असतं, तर जिंकलेली रक्कम थेट 5 लाख रुपयांवर आली असती. म्हणून डॉक्टरांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला. अशात पूर्ण खात्री नसल्यामुळं त्यांनी 25 लाख रुपये घेऊन खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला.

डॉ. जागृती अग्रवाल यांनी खेळ सोजण्याचा निर्णय घेतल्यानंतर, बिग बींनी त्यांना उत्तर लॉक करण्यास सांगितलं. तेव्हा. डॉ. जागृती अग्रवाल यांनी बरोबर उत्तर दिलं. उत्तर सांगत जागृती म्हणाल्या, ‘क्लारा जेटकिन’, त्यांचं उत्तर त्यांनी दिलं. अशात त्यांची 50 लाख रुपये जिंकण्याची संधी हुकली. सांगायचं झालं तर केबीसी पाहणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे.

 

 

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us