‘निघण्याचा विचार होता पण…’ मध्यरात्री 2:15 वाजता अमिताभ बच्चन यांच्या ट्विटने घाबरले चाहते

Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांच्या ट्विटने चाहते चिंतेत 'जाण्याची वेळ आली...', या ट्विटनंतर आणखी एक ट्विटने घाबरले चाहते, सर्वत्र बिग बींच्या ट्विटची चर्चा, अमिताभ बच्चन का करत आहेत असे ट्विट?

निघण्याचा विचार होता पण... मध्यरात्री 2:15 वाजता अमिताभ बच्चन यांच्या ट्विटने घाबरले चाहते
| Updated on: Feb 09, 2025 | 12:11 PM

Amitabh Bachchan: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन कायम सोशल मीडियावर सक्रिय असतात. बिग बी कायम ब्लॉग देखील लिहित असतात. अमिताभ बच्चन कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. सांगायचं झालं तर 7 फेब्रुवारी रोजी अमिताभ बच्चन यांनी ‘जाण्याची वेळ आली…’ असं ट्विट केलं होतं. ट्विट पाहिल्यानंतर चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. आता 9 फेब्रुवारी मध्यरात्री 2:15 वाजता पुन्हा अमिताभ बच्चन यांनी ट्विट केलं आहे.

मध्यरात्री बिग बींनी ट्विट केल्यामुळे चाहत्यांना देखील धक्का बसला आहे. बिग बींनी केलेल्या ट्विटनंतर एवढ्या रात्री ट्विट का केलं? असा प्रश्न चाहते विचारत आहेत. अमिताभ बच्चन ट्विट करत म्हणाले, ‘जाण्याची इच्छा होती… पण जावे लागले…’ सध्या बिग बींचं ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 

 

बिग बींच्या ट्विटवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘सर आता झोपा नाही तर, जया बच्चन येतील’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘आता शांत बसा सर… कालपासून तुम्ही मला घाबरवत आहात…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अमिताभ बच्चन यांच्या ट्विटची चर्चा रंगली आहे.

 

 

अमिताभ बच्चन यांचे आगामी सिनेमे

बिग बींच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, सध्या अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती 16’ शो होस्ट करत आहे. सध्या त्यांनी कोणत्या सिनेमाची घोषणा केलेली नाही. पण बिग बी ‘रामायण’ सिनेमात झळकतील असं सांगण्यात येत आहे. वयाच्या 82 व्या वर्षी देखील बिग बी मोठ्या पडद्यावर सक्रिय आहे. त्यांना रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आजही तितकेच उत्सुक असतात.