Anand Mahindra यांनी चालविली तब्बल 600 किलोची Bujji car, अभिनेता प्रभासने कल्की चित्रपटात….

बुज्जी कार खास बनविण्यात आली आहे, जिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आतापर्यंत हॅमर कार तिच्या प्रचंड आकाराबद्दल चर्चेत होती आता बुज्जी कार देखील चर्चेत आली आहे काय आहे या कारचे वैशिष्ट्ये...

Anand Mahindra यांनी चालविली तब्बल 600 किलोची Bujji car, अभिनेता प्रभासने कल्की चित्रपटात....
Anand Mahindra drove a 600 kg Bujji car Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jun 13, 2024 | 4:04 PM

नागा अश्विन यांचे लेखन आणि दिग्दर्शन असलेल्या Kalki 2898 AD या चित्रपटाची सर्वजण वाट पाहात आहेत, हा चित्रपट प्रदर्शिक होण्यापूर्वीच या चित्रपटात वापरलेली खास कार चर्चेत आहेत. आता आनंद महिंद्र यांनी बुज्जी कारला ड्राइव्ह करताना दिसले आहेत. काय आहे ही Bujji car तिचा वापर या सायन्स फिक्शन चित्रपटात अभिनेता प्रभास याने केला आहे. हा चित्रपटाचे बजेट देखील चर्चेचा विषय ठरले असून चित्रपट नावावरुनच आणि त्यातील स्टारकास्टवरुनही चर्चेत आहे.

महिंद्रा अँड महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्र सोशल मिडीयावर सक्रीय असतात. त्यांच्या पोस्ट देखील प्रेरक आणि वैशिष्ट्यपूर्ण असतात. ते नेहमीच कलागुणांचे कौतूक करीत असतात. त्यांच्या पोस्ट नेहमीच ट्रेंडिंगमध्ये असतात. ज्यामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. आता महिंद्र ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्र पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत आणि यावेळी ते नागा अश्विन लिखित आणि दिग्दर्शित कल्की 2898 एडी या आगामी सायन्स फिक्शन चित्रपटात दिसलेली बुज्जी कार चालवून तिचा अनुभव घेतला आहे. भारतातील पहिला फॉर्म्युला वन कार चालक नारायण कार्तिकेयन यांने देखील बुज्जी कार चालवली आहे आणि ही कार चालवल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया होती की ही एक स्पेसशिप वाटत आहे.

बुज्जी कार कोणी बनवली ?

Kalki 2898 AD या चित्रपटात अभिनेता प्रभास याने वापरलेली बुज्जी कार वेगळी आहे. 27 जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. हे वाहन ऑटोमोबाईल कंपनी महिंद्रा अँड महिंद्र कंपनीच्या कोयम्बतूरच्या जयम मोटर्सच्या यांच्या सहकार्याने विकसित केले आहे.

येथे पाहा Bujji कारच्या ड्राईव्हचा आनंद महिंद्र यांनी घेतलेल्या अनुभवाचा व्हिडीओ –

बुज्जी कारची वैशिष्ट्ये

बुज्जी कार केशरी रंगाची आहे. या कारचे वजनच तब्बल 6 टन आहे. या कारचे वैशिष्ट्ये म्हणजे बुज्जी कारमध्ये 47 किलोवॅटची पॉवरफुल बॅटरी आहे. याशिवाय ही कार 94 kW आणि 9800 Nm टॉर्क एवढी पॉवर जनरेट करते.

सर्वसाधारण कारमध्ये चार चाक आहेत. तर बुज्जी कारमध्ये चार नाही तर तीन टायर आहेत, दोन टायर समोर आणि एक टायर मागच्या बाजूला आहे. या कारमध्ये बसवलेले टायर्स खास कल्की चित्रपटासाठी डिझाइन केले आहेत. कारण समोरच्या टायरची लांबी 6.075 मिमी आणि रुंदी 3380 मिमी आणि उंची 2186 मिमी इतकी प्रचंड आहे. या कारमध्ये AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाही वापर केला आहे.

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.