
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे तिच्या स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळखली जाते. सध्या अनन्या नवनवीन फोटोशूट करत चाहत्यांशी कनेक्ट होत आहे. आता तिनं काही सुंदर फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती परदेशात धमाल करताना दिसतेय.

नुकतंच शेअर केलेल्या या फोटोंमध्ये तिनं निळ्या रंगाचा डेनिम पॅन्ट परिधान केला आहे. सोबतच तिनं पांढर्या रंगाचं क्रॉप टॉपही कॅरी केलं आहे.

ती एका सुंदर निसर्गरम्य ठिकाणी पोझ देताना दिसतेय. सोबतच तिची बहीण तिच्या सोबत फोटोमध्ये दिसतेय.

लूक पूर्ण करण्यासाठी तिनं पायात स्निकर्स इंडियाचे व्हाईट स्निकर्स आणि ब्राऊन रंगाची बॅगेट बॅग कॅरी केली आहे. सोबतच तिनं कोरोनाचा विचार करता ब्लॅक फेस मास्क देखील घातला आहे.

अनन्या पांडेच्या कामाविषयी बोलायचं झालं तर ती पुढच्या वर्षी ‘लिव्हर’मध्ये विजय देवरेकोंडासोबत झळकणार आहे. हा चित्रपट यावर्षी रिलीज होणार आहे.