
मेक्सिकोची अँड्रिया मेझा मिस युनिव्हर्स 2020 ची विजेती ठरली आहे.

तिला माजी मिस युनिव्हर्स जोजिबिनी टूंजीनं क्राऊन घातला.

फ्लोरिडामध्ये हा कार्यक्रम पार पडला. ब्राझीलची ज्युलिया गामा फर्स्ट रनरअप ठरली.

तर पेरूची जॅनिक मॅसेटा सेकंड रनरअप ठरली.

भारताची अॅडलिन कॅस्टेलिनो थर्ड रनरअप ठरली.

अँड्रिया मेझा ही एक सॉफ्टवेअर अभियंता असून मिस युनिव्हर्स ठरणारी ती तिसरी मेक्सिकन महिला ठरली आहे.

अँड्रिया मेझा लैंगिक असमानता आणि लैंगिक हिंसेबद्दल नेहमी बोलताना दिसते. एवढंच नाही तर या स्पर्धेदरम्यान तिनं अनेक मोठी विधानं केली आहेत.

अँड्रिया मेझा 26 वर्षांची असून चिहुआहुआ या शहरात 13 ऑगस्टला तिचा जन्म झाला होता. अल्मा कार्मोना आणि सॅन्टियागो मेझा यांची ती मुलगी आहे.