AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हार्ट अटॅकनंतर श्रेयस तळपदे याची झाली Angioplasty, जाणून घ्या कधी केली जाते आणि किती खर्च येतो?

Angioplasty : श्रेयस तळपदे याला हृदयविकाराचा झटका, करण्यात आली अँजिओप्लास्टी, जाणून घ्या कधी केली जाते अँजिओप्लास्टी आणि यासाठी किती खर्च येतो? डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार होतात रुग्णावर उपचार

हार्ट अटॅकनंतर श्रेयस तळपदे याची झाली Angioplasty, जाणून घ्या कधी केली जाते आणि किती खर्च येतो?
| Updated on: Dec 16, 2023 | 4:14 PM
Share

मुंबई | 16 डिसेंबर 2023 : गुरुवारी अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) याला हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यामुळे अभिनेत्याच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला. ‘वेलकम टू द जंगल’ सिनेमाची शुटिंग पूर्ण करून मुंबईत परतलेल्या श्रेयस याला हृदयविकाराचा झटका येताच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात दाखल होताच अभिनेत्याची अँजिओप्लास्टी (Angioplasty) करण्यात आली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अभिनेत्यावर सर्जरी यशस्वी ठरली आहे. आता अभिनेत्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देखील समोर येत आहे.

श्रेयस याच्या आधी देखील अनेक सेलिब्रिटींना हृदयविकाराचा झटका आला आहे. ज्यामुळे त्यांच्यावर देखील अँजिओप्लास्टी (Angioplasty) ही शस्त्रक्रिया करण्यात आली. तर एंजियोप्लास्टी कधी करण्यात येते आणि यासाठी एकंदर किती खर्च येतो… याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

काय आहे अँजिओप्लास्टी?

अँजिओप्लास्टी ही एक शस्त्रक्रिया आहे. ही शस्त्रक्रिया हृदयविकाराच्या झटक्यामुळे ब्लॉक झालेल्या कोरोनरी धमन्या उघडण्यासाठी केली जाते. या प्रक्रियेत, हृदयाच्या स्नायूंमध्ये ब्लड सर्कुलेशन ओपन हार्ट सर्जरीशिवाय पुन्हा सुरळीत केलं जातं. सांगायचं झालं तर, अँजिओप्लास्टीला वैद्यकीय भाषेत पर्क्यूटेनियस कोरोनरी इंटरव्हेंशन (PCI) असं देखील म्हणतात.

हृदयविकाराच्या झटक्यामुळे रुग्णाची प्रकृती अतीगंभीर असल्यास अँजिओप्लास्टी ही शस्त्रक्रिया करण्यात येते. रुग्णाची प्रकृती लक्षात घेत डॉक्टर अँजिओप्लास्टी ही शस्त्रक्रिया करायची की नाही… यावर सल्ला देतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णावर पुढील उपचार होतात.

अँजिओप्लास्टीसाठी किती खर्च येतो?

प्रत्येक देशात अँजिओप्लास्टीसाठी येणार खर्च वेगळा आहे. भारतात देखील वेगळ्या रुग्णालयात अँजिओप्लास्टीसाठी येणार खर्च वेगळा आहे. सरकारी रुग्णालयात अँजिओप्लास्टीसाठी येणार खर्च कमी असला तरी, इतर गोष्टींसाठी लागणारा खर्च वेगळा असतो. तर खासगी रुग्णालयात अँजिओप्लास्टीसाठी येणार खर्च 2 ते 3 लाख रुपये असतो.  महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक रुग्णालयात अँजिओप्लास्टीसाठी येणार खर्च  वेगळा असतो.

Disclaimer : लेखात नमूद केलेली पद्धत आणि सूचना अंमलात आणण्यापूर्वी डॉक्टर किंवा संबंधित तज्ञांचा सल्ला नक्कीच घ्या.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत