लग्न झालंय, तरी बबिताजींच्या मागे लागलेत जेठालाल..; अनिरुद्धाचार्यांची टिप्पणी ऐकून भिडेच्या पत्नीचं भन्नाट उत्तर

विवाहित असूनही जेठालाल बबिताजींच्या मागे का असतात? अनिरुद्धाचार्य यांनी भिडेच्या पत्नी स्नेहल चंदवडकर यांच्यासमोर केली मिश्किल टिप्पणी. त्यावर स्नेहल यांनी दिलेलं उत्तर ऐकून उपस्थितांनाही हसू आवरलं नाही.

लग्न झालंय, तरी बबिताजींच्या मागे लागलेत जेठालाल..; अनिरुद्धाचार्यांची टिप्पणी ऐकून भिडेच्या पत्नीचं भन्नाट उत्तर
दिलीप जोशी, मुनमुन दत्ता, अनिरुद्धाचार्य
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 29, 2026 | 10:17 AM

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेतील जेठालाल आणि बबिताजी यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष आवडते. जेठालाल विवाहित असूनही बबिताजींचं कौतुक करण्याची आणि त्यांच्याभोवती घुटमळण्याची एकही संधी सोडत नाहीत. मालिकेतील हा विनोदी ट्रॅक प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. आता प्रसिद्ध कथावाचक अनिरुद्धाचार्य यांनीही जेठालाल आणि बबिताजी यांच्या नात्यावर मजेशीर टिप्पणी केली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी ही टिप्पणी थेट भिडेची ऑफस्क्रीन पत्नी स्नेहल चांदवडकर यांच्यासमोर केली. त्यावर स्नेहल यांनी दिलेलं उत्तर सध्या चर्चेत आहे.

भिडेंच्या पत्नीची अनिरुद्धाचार्य महाराजांसोबत खास भेट

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये भिडे ही भूमिका साकारणारे अभिनेते मंदार चांदवडकर यांच्या पत्नी स्नेहल चांदवडकर नुकत्याच अनिरुद्धाचार्य यांच्या आश्रमात पोहोचल्या होत्या. यावेळी त्यांनी महाराजांशी विविध विषयांवर संवाद साधला. गप्पांच्या ओघात अनिरुद्धाचार्य यांनी त्यांना मालिकेबद्दल काही प्रश्न विचारले. स्नेहल या मालिकेच्या सेटवर जातात का, अशी विचारणा त्यांनी केली. त्यावर शूटिंग सुरू असताना त्या सेटवर जात नाहीत, मात्र कधीकधी पॅकअपच्या वेळी तिथे जात असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर त्या मंदार यांच्यासोबत बाहेर फिरायला किंवा जेवायला जातात, असंही त्यांनी सांगितलं.

Loading...

पहा व्हिडीओ-

अनिरुद्धाचार्य यांची मिश्किल टिप्पणी

यावेळी अनिरुद्धाचार्य यांनी स्नेहल यांना जेठालाल यांच्या लग्नाबद्दल विचारलं. जेठालाल यांचं लग्न झालं आहे का, असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर स्नेहल यांनी होकार देत त्यांच्या मुलांचंही लग्न झालं असल्याचं सांगितलं. हे ऐकल्यानंतर अनिरुद्धाचार्य यांनी मिश्किलपणे टिप्पणी केली की, लग्न झालेलं असूनही जेठालाल बबिताजींच्या मागे असतात. त्यांच्या या वक्तव्यावर स्नेहल यांनीही हसत उत्तर दिलं. त्या म्हणाल्या, ‘मला इथे एक गोष्ट संपूर्ण जनतेला सांगायची आहे. जेठालाल बबिताजींच्या मागे नक्की असतात, पण मर्यादेत राहून!’ स्नेहल यांच्या या उत्तरामुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला.

अनिरुद्धाचार्यांचाही मिश्किल टोला

स्नेहल यांच्या उत्तरानंतर अनिरुद्धाचार्य यांनी आणखी एक मजेशीर टिप्पणी केली. म्हणजे तुम्हीही भिडे भाऊंना मर्यादेत राहून असं करण्याची परवानगी देत असाल, असा टोला त्यांनी लगावला. मात्र, आपण हे सर्व केवळ विनोदाने बोलत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. जेठालाल हे बापूजींचा आदर करणारे संस्कारी मुलगा असल्याचंही ते म्हणाले. या भेटीदरम्यान स्नेहल यांनी गौरी गोपाल आश्रमातील अनुभवही सांगितला. तिथल्या वृद्ध महिलांना भेटल्यानंतर त्या भावूक झाल्या होत्या. काही ठिकाणी त्यांना इतकं भरून आलं की, बोलण्यासाठी शब्दच उरले नव्हते, असं त्यांनी सांगितलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us