AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | शिमरी साडी अन् डायमंड नेकलेस, ‘पाठक’बाईंच्या नव्या लूकला ग्लॅमरचा तडका! पाहा खास व्हिडीओ  

नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात अक्षयाने आपल्या ‘तुझ्यात जीव रंगला’च्या टीमसोबत हजेरी लावली होती. यावेळी शिमरी साडी, डार्क मेकअप, डायमंड नेकलेस असा अक्षयचा ग्लॅमरस लूक सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत होता.

Video | शिमरी साडी अन् डायमंड नेकलेस, ‘पाठक’बाईंच्या नव्या लूकला ग्लॅमरचा तडका! पाहा खास व्हिडीओ  
अक्षया देवधर
| Updated on: Mar 22, 2021 | 1:13 PM
Share

मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेतील अंजलीच्या भूमिकेमुळे अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) घराघरात पोहोचली. खरं तर अंजलीपेक्षा ‘पाठकबाई’ हीच तिला मिळालेली खरी ओळख. राणादासोबत तिची ऑन स्क्रीन जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. अगदी काहीच महिन्यांपूर्वी ही मालिका ऑफ एअर गेली आहे. मात्र, तरीही चाहत्यांच्या मनातील ‘अंजली बाई’ आणि ‘राणा दा’ यांच्याबद्दलचे प्रेम तसूभरही कमी झालेले नाही. मालिका ऑफ एअर गेल्यानंतर ‘अंजली बाई’ अर्थात अभिनेत्री अक्षया देवधर फिटनेसकडे वळली. सध्या तिचे सोशल मीडियावरील काही व्हिडीओ खूप चर्चेत आहेत (Anjali Bai Fame Actress Akshaya Deodhar glamours look).

अक्षया सध्या स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देत असून, जिम ट्रेनिंग आणि व्यायामाचे फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. इतकेच नव्हे तर या दरम्यान तिने तिच्या जुन्या मित्र-मैत्रिणींच्या भेटी घेण्यासही सुरुवात केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात अक्षयाने आपल्या ‘तुझ्यात जीव रंगला’च्या टीमसोबत हजेरी लावली होती. यावेळी शिमरी साडी, डार्क मेकअप, डायमंड नेकलेस असा अक्षयचा ग्लॅमरस लूक सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत होता. पडद्यावर दिसलेल्या सध्या-भोळ्या अंजलीबाई याच का?, असा प्रश्नही तिच्या चाहत्यांना पडला आहे. या लूकसाठी तयार होत असतानाचा व्हिडीओ अक्षयाने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

पाहा अक्षयचा नवा लूक!

View this post on Instagram

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

या व्हिडीओमध्ये अक्षया या कार्यक्रमासाठी तयार होताना दिसत आहे. शिमरी साडीसह, बोल्ड लूक देणारा ब्लाउज, चोकर नेकलेस, गडद मेकअप करून अक्षया फोटोसाठी पोझ देताना दिसत आहे (Anjali Bai Fame Actress Akshaya Deodhar glamours look).

हम है नये अंदाज क्यू हो पुराना?

मालिका ऑफ एअर गेल्यानंतर अक्षयला कामातून उसंत मिळाली आहे. दरम्यान, तिने तिच्या जुन्या मित्र-मैत्रिणींच्या भेटी घेण्यासही सुरुवात केली आहे. सध्या ती तिच्या मैत्रिणींबरोबर धमाल करताना दिसते. असाच मैत्रिणींसोबतचा एक व्हिडीओ अक्षयाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. यामध्ये ती मैत्रीणींसोबत ‘हम है नये, अंदाज क्यू हो पुराना? या गाण्यावर नाचताना दिसली होती.

सोशल मीडियावर सक्रिय अक्षया

अक्षया देवधर सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय असते. ती तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो सतत चाहत्यांसोबत शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता आणि तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल चाहत्यांना थोडीशी कल्पना दिली होती.

(Anjali Bai Fame Actress Akshaya Deodhar glamours look).

हेही वाचा :

PHOTO | चंद्रकला पैठणीत खुललं अप्सरेचं सौंदर्य, पाहा सोनाली कुलकर्णीचा नवा लूक!

Arshi Khan : राखी सावंतनंतर आता बिग बॉस फेम अर्शी खानचं स्वयंवर, वाचा सविस्तर

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.