
Ankita Lokhande Helper Daughter Miossing case: अभिनेत्री अंकिता लोखंडे दोन दिवसांपासून तुफान चर्चेत आहे. अंकिता लोखंडे हिच्या घरी काम करणारी महिला कांता हिचे मुलगी सलोनी आणि तिची मैत्रिण सोनल गेल्या 72 तासांपासून गायब आहेत. पोलिसांकडून मुलींना शोधण्यासाठी शोधकार्य सुरु आहे. पण अद्याप मुलींचा पत्ता लागलेला नाही. अभिनेत्री पती विकी जैन देखील सतत पोलिसांकडे जात आहे आणि मुलींबद्दल विचारत आहे. अभिनेत्रीने तिच्या मोलकरणीच्या मुलीच्या आणि तिच्या मैत्रिणीच्या शोधासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार अस्लम शेख यांच्याकडेही मदत मागितली आहे.
मोलकरणीची मुली लेक गायब झाल्यानंतर अभिनेत्री मोठं वक्तव्य केलं आहे. ‘मुलींबद्दल अद्याप कोणतीच माहिती मिळाली नाही. विक्की सतत पोलीस स्टेशनमध्ये जात आहे आणि आम्ही पोलिसांच्या संपर्कात आहोत. आम्ही मालवणी येथील आमदार अस्लम शेख यांच्याशीही संपर्क साधला आहे.’
बेपत्ता मुलीच्या आईबद्दल अंकिता म्हणाली, ‘एक आई तिच्या मुलीसाठी सतत रडत आहे. एका आईला असं रडताना पाहणं फार वाईट आहे… आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत… आम्ही मुलीला पुन्हा घरी आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहोत…’ सध्या सर्वत्र अंकिता हिच्या घरातून बेपत्ता झालेल्या मुलींची चर्चा रंगली आहे.
अंकिता लोखंडे हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत गायब झालेल्या मुलींचे फोटो पोस्ट केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुली 31 जुलैपासून बेपत्ता आहे. पोस्ट शेअर करत अंकिता म्हणाली, ‘आमची मोलकरीण कांताची मुलगी आणि तिची मैत्रिण सलोनी आणि नेहा 31 जुलै सकाळी 10 वाजे पासून गायब आहेत. दोघी शेवटी वाकोला परिसरात दिसल्या. मालवणी पोलिस ठाण्यात आधीच एफआयआर दाखल करण्यात आला आहे, परंतु त्याचा पत्ता अद्याप लागलेला नाही.’
अंकिता लोखंडे हिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतरांसह मुंबई पोलिसांना मदतीचं आवाहन केलं आहे. सांगायचं झालं तर, घरातली मोलकरणीची मुलगी आणि तिची मैत्रिण एकत्र गायब झाल्यामुळे खळबळ माजली आहे. अद्याप दोन्ही मुलींबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलीस मुलींचा शोध घेत आहे.