अंकिता लोखंडेच्या घरातून 2 मुली गायब, नक्की काय आहे प्रकरण, पोलिसांची चौकशी सुरु
'पवित्र रिश्ता' फेम अंकिता लोखंडेच्या घरातून 2 मुली गायब, काय होतं शेवटची लोकेशन? पोलिसांकडून चौकशी सुरु... अभिनेत्रीने देखील पोस्ट शेअर करत व्यक्त केली चिंता...

अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या सर्वत्र चर्चेत आहे. अभिनेत्रीच्या घरी काम करणाऱ्या महिलेची मुलगी बेपत्ता झाली आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी शोधकार्यास सुरुवात केली आहे. एवढंच नाहीतर, खुद्द अंकिता हिने सोशल मीडियावर पोस्ट करत मदतीसाठी आवाहन केलं आहे. सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अभिनेत्रीच्या मोलकरणीची मुलगी आणि तिची मैत्रिण बेपत्ता होऊन एक दिवसापेक्षा जास्त काळ लोटला आहे. त्यांनी मुंबई पोलिसांकडे मदतीची विनंती केली आहे.
अंकिता लोखंडे हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत गायब झालेल्या मुलींचे फोटो पोस्ट केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुली 31 जुलैपासून बेपत्ता आहे. पोस्ट शेअर करत अंकिता म्हणाली, ‘आमची मोलकरीण कांताची मुलगी आणि तिची मैत्रिण सलोनी आणि नेहा 31 जुलै सकाळी 10 वाजे पासून गायब आहेत. दोघी शेवटी वाकोला परिसरात दिसल्या. मालवणी पोलिस ठाण्यात आधीच एफआयआर दाखल करण्यात आला आहे, परंतु त्याचा पत्ता अद्याप लागलेला नाही.’
चिंता व्यक्त करत अभिनेत्री म्हणाली, ‘त्या फक्त आमच्या घरातला भाग नाही तर, आमचं कुटुंब आहे. आम्ही प्रचंड चिंतेत आहोत. मुंबई पोलीस आणि मुंबईकरांनी विनंती करतो मुलींबद्दल कोणतीही माहिती मिळाल्यास मदत करा. जवळच्या पोलीस स्थानकात जाऊन मुलींबद्दल सांगा.. या कठीण वेळी तुमचा पाठिंबा आणि प्रार्थना खूप महत्वाच्या आहेत.’ सध्या अंकिताची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सरकारकडून मदतीचे आवाहन
अंकिता लोखंडे हिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतरांसह मुंबई पोलिसांना मदतीचं आवाहन केलं आहे. सांगायचं झालं तर, घरातली मोलकरणीची मुलगी आणि तिची मैत्रिण एकत्र गायब झाल्यामुळे खळबळ माजली आहे. अद्याप दोन्ही मुलींबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलीस मुलींचा शोध घेत आहे.
अंकिता हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अंकिता अलीकडेच भारती सिंगच्या होस्ट असलेल्या सेलिब्रिटी कुकिंग-कॉमेडी रिअॅलिटी शो ‘लाफ्टर शेफ’ मध्ये पती विक्की जैनसोबत दिसली. अंकिता आणि विकी यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
अंकिता सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर देखील अंकिताच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. अभिनेत्री कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

