AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानचा आतापर्यंतचा सर्वात भयानक हल्ला, तालिबानच्या सर्वोच्च नेत्यासोबत भयंकर घडलं; रात्रीच्या अंधारात थेट…

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संघर्ष अजूनही संपलेला नाही. आता नुकतेच पाकिस्तानने अफगाणिस्तावर मोठे हवाई हल्ले केले आहेत. अफगाणिस्तान सरकारने हे हल्ले झाल्याचे मान्य केले आहे.

पाकिस्तानचा आतापर्यंतचा सर्वात भयानक हल्ला, तालिबानच्या सर्वोच्च नेत्यासोबत भयंकर घडलं; रात्रीच्या अंधारात थेट...
paksitan taliban war (संग्रहित छायाचित्र)Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 15, 2026 | 10:37 PM
Share

Pakistan Afghanistan War : जगाने एकीकडे अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाने धसका घेतला आहे. 28 फेब्रुवारी रोजी युद्ध सुरू झाल्यानंतर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली. त्यामुळे भारतासह अनेक देशांना कच्चे तेल, नैसर्गिक वायू यासारख्या इंधनाचा पुरवठा पूर्णपणे थांबला. परिणामी आता भारतासह जगभरात इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. या युद्धात साधारण 2000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे या युद्धात जग होरपळत असताना आता दुसरीकडे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संघर्षही दिवसेंदिवस वाढतच आहे. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार पाकिस्तानने अफगाणिस्तानवर मोठा आणि भीषण हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे आता अफगाणिस्तानही पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे हा संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पाकिस्तानने नेमका कुठे हल्ला केला?

मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानी लष्कराने दक्षिण अफगाणिस्तानातील कंधार प्रांतात हवाई हल्ला केला आहे. तालिबानच्या सैन्य ठिकाणांवर हा हल्ला करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तानच्या या हल्ल्यात तालिबानचे सर्वोच्च नेते हिबतुल्लाह अखुंदजादा यांच्याशी संबंधित असलेली तांत्रिक उपकरणं तसेच इतर महत्त्वाचे सामान नष्ट करण्यात आले आहे. पाकिस्तानने केलेल्या आणखी एका हल्ल्यात कंधारमधील एका बोगद्याला लक्ष्य करण्यात आलं. या बोगद्याच्या मदतीने कथितपणे तालिबान आणि टीटीपीचे सदस्य पाकिस्तानविरोधात कारवाई करायचे. पाकिस्तानवर काही दिवसांपूर्वी झालेल्या हल्ल्यांना टीटीपी ही संघटना जबाबदार आहे, असा पाकिस्तान सरकारचा दावा आहे.

तालिबान सरकारने नेमकी काय माहिती दिली?

या हल्ल्याबाबत कंधार येथील स्थानिकांनी माहिती दिली आहे. आमच्या शहरावरून लढाऊ विमाने उडताना दिसत होती. रात्रभर स्फोटाचे आवाज येत होते, असे तेथील लोकांनी सांगितले आहे. दुसरीकडे तालिबान सरकारचे प्रवक्ते जिबुल्लाह मुजाहीद यांनी पाकिस्तानकडून हल्ला झाल्याचे सांगितले आहे. पाकिस्तानच्या हल्ल्यात व्यसनमुक्ती केंद्र तसेच एका रिकाम्या कंटेनरचे किरकोळ नुकसान झाले आहे.

दरम्यान, आता पाकिस्तानने केलेल्या या हल्ल्याला अफगाणिस्तान नेमके काय प्रत्युत्तर देणार, याकडे जगभराचे लक्ष लागले आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल