AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बिग बॉस’मध्ये सतत सुशांतचा उल्लेख का केला? अंकिताने सांगितलं खरं कारण

'बिग बॉस' या शोमध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडेनं अनेकदा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचं नाव घेतलं होतं. यासाठी अनेकांनी तिला ट्रोलसुद्धा केलं होतं. यावर आता खुद्द अंकिताने स्पष्टीकरण दिलं आहे. सुशांतचं नाव ती का घ्यायची, याबद्दल तिने सांगितलं आहे.

'बिग बॉस'मध्ये सतत सुशांतचा उल्लेख का केला? अंकिताने सांगितलं खरं कारण
Sushant and AnkitaImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 17, 2025 | 2:35 PM
Share

मुंबई : 8 फेब्रुवारी 2024 | अभिनेत्री अंकिता लोखंडेचा ‘बिग बॉस 17’मधील प्रवास अनेक आव्हानांनी आणि अडथळ्यांनी भरलेला होता. असं असूनही तिने टॉप 4 स्पर्धकांमध्ये आपलं स्थान निश्चित केलं होतं. बिग बॉसच्या घरात अंकिताने अनेकदा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा उल्लेख केला होता. त्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती. अंकिताने सहानुभूती मिळवण्यासाठी सुशांतच्या नावाचा वापर केला असा आरोप अनेकांनी तिच्यावर केला. इतकंच नव्हे तिच्या सासूनेही यावरून सुनावलं होतं. प्रेक्षकांची आणि इतर स्पर्धकांची सहानुभूती मिळवण्यासाठी अंकिता घरात सतत सुशांत सिंह राजूपतचं नाव घेते, असं विकी जैनची आई रंजना जैन म्हणाली होती. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अंकिताने यावर मौन सोडलं आहे. सुशांतबद्दल बोलण्यासाठी मला कोणाचीही परवानगी घ्यायची गरज नाही आणि मी कोणालाही त्याबद्दल उत्तर देण्यास बांधिल नाही, असं तिने म्हटलंय.

“मला कोणाकडूनही परवानगी घ्यायची गरज नाही”

‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत अंकिता म्हणाली, “होय, मी त्याबद्दल वाचलंय आणि मला हेच सांगायचं आहे की मला कोणाच्याही फॅन फॉलोईंगची गरज नाही. मला कोणाबद्दल बोलण्यासाठी कोणाकडूनही परवानगी घ्यायची गरज नाही. जर एखाद्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यात खरंच काही चांगल्या गोष्टी केल्या असतील, तर मी नक्कीच त्यावर चर्चा करेन. मी बिग बॉसच्या घरात माझ्या वडिलांबद्दलही खूप बोलायचे. कारण ते माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग होते.”

“मी लोकांना उत्तर देण्यास बांधिल नाही”

“होय, मी सुशांतबद्दल बोलायचे, कारण जर माझ्यासमोर एखादा मुलगा बसला असेल आणि त्याच्यासाठी सुशांत प्रेरणास्थान असेल आणि मला सुशांतविषयी काही माहिती असेल तर त्याबद्दल मी त्यांच्यासोबत का बोलू नये? सुशांतबद्दलच्या चांगल्या गोष्टी मी त्यांना का सांगू नये? मी नक्कीच त्या व्यक्तीला प्रोत्साहित करेन. जर एखादी व्यक्ती या जगात नसेल आणि त्या व्यक्तीने आयुष्यात काही चांगल्या गोष्टी केल्या असतील तर त्याबद्दल चर्चा करण्यात मला कोणतीच समस्या नाही. माझ्या पतीलाही कोणती समस्या नाही. त्यामुळे मी लोकांना उत्तर देण्यास बांधिल नाही”, अशी सडेतोड प्रतिक्रिया तिने दिली.

बिग बॉसमध्ये काय शिकायला मिळालं?

बिग बॉसच्या घरात राहून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या असंही अंकिताने या मुलाखतीत सांगितलं. “माझ्या प्रवासातून मी हेच शिकले की तुम्ही कधीच अती भावूक किंवा अती व्यक्त होऊ नये. या दोन गोष्टी तुम्ही कधी कधी टाळायला हव्यात. तुमच्या भावनांवर आणि प्रतिक्रियांवर तुमचं नियंत्रण असायला हवं. बिग बॉसचं घर तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकवतं”, असं ती पुढे म्हणाली.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना