AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंकिता लोखंडे प्रेग्नेंट आहे? पती विकीसोबत मालदीव व्हॅकेशनमधील अंकिताचे फोटो पाहून सोशल मीडियावर चर्चा

टीव्ही इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध जोडपे अंकिता लोखंडे आणि विकी जैन सध्या सुट्टीवर आहेत. व्हॅकेशनमधील त्यांचे फोटो समोर आले आहेत ज्यात अंकिताचे पोट पाहून ती प्रेग्नेंट असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

अंकिता लोखंडे प्रेग्नेंट आहे? पती विकीसोबत मालदीव व्हॅकेशनमधील अंकिताचे फोटो पाहून सोशल मीडियावर चर्चा
Ankita Pregnancy RumorsImage Credit source: instagram
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: May 22, 2025 | 1:26 PM
Share

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन हे चाहत्यांच्या आवडत्या जोडीपैकी एक आहे. चाहत्यांना हे जोडपे खूप आवडते आणि ते दोघांशी संबंधित अपडेट्स मिळविण्यासाठी उत्सुक असतात. सध्या हे जोडपे मालदीवमध्ये सुट्ट्या घालवत आहे. अंकिता लोखंडेने सुट्टीतील अनेक फोटो शेअर केले आहेत ज्यात दोघेही संध्याकाळी समुद्रकिनाऱ्यावर रोमँटिक होताना दिसत आहेत. ‘लाफ्टर शेफ्स 2’ च्या सेटवर अनेक वाद आणि मारामारीनंतर, त्यांना अशा प्रकारे एकत्र वेळ घालवताना पाहणे चाहत्यांसाठी एखाद्या मेजवानीपेक्षा कमी नाही. दरम्यान, अभिनेत्रीचा फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनी ती प्रेग्नेंट असल्याचा अंदाज लावण्यास सुरुवात केली आहे.

इंस्टाग्रामवर मालदीवच्या सुट्टीतील फोटो शेअर

अंकिता लोखंडेने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर मालदीवमधील सुट्टीतील काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये हे जोडपे रोमँटिक पोझ देताना दिसत आहे. समुद्रकिनाऱ्यावरील दोघांचेही सिझलिंग फोटो खूप पसंत केले जात आहेत. दोघांचीही स्टाईल पाहण्यासारखी आहे.

फोटोंमध्ये अंकिता तिचा पती विक्कीच्या मिठीत पोझ देताना दिसत आहे

शेअर केलेल्या फोटोंमध्ये अंकिता तिचा पती विक्की जैनच्या मिठीत पोझ देताना दिसत आहे. दोघेही त्यांच्या सुट्टीचा खूप आनंद घेत आहेत. दरम्यान या फोटोंमध्ये नेटकऱ्यांनी तिच्या पोटाकडे पाहून कमेंट्स करायला सुरुवात केली आहे. तिच्या पोटाकडे पाहून नेटकऱ्यांनी तिच्या प्रेग्नेंट असण्याबद्दल विचारणा करण्यास सुरुवात केली. सध्या याची पुष्टी करता येत नाही. याबद्दल जोडप्याकडून कोणतेही विधान आलेले नाही.

फोटोमध्ये दिसणारे अंकिताचे पोट पाहून नेटकरी गोंधळात

टीव्ही शहरातील या प्रसिद्ध जोडप्याचे फोटो सोशल मीडियावर खूप पसंत केले जात आहेत. कमेंट सेक्शन प्रतिक्रियांनी भरले आहे. एका युजरने लिहिले आहे की, ‘तू प्रेग्नेंट दिसतेस.’ दुसऱ्या एका युजरने लिहिले, ‘ती प्रेग्नेंट आहे का?.’ एका युजरने लिहिले आहे की ‘बेबी बंप…’. शक्यतो तिच्या फोटोंकडेपाहून नेटकऱ्यांनी शक्यतो हाच प्रश्न विचारला आहे की,ती प्रेग्नेंट आहे का?

‘पवित्र रिश्ता’ या टीव्ही शोमधून प्रसिद्धी मिळवणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने 2021 मध्ये उद्योगपती विकी जैनशी लग्न केलं. या शाही लग्नासाठी दोघांनीही पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे. त्यांचे लग्न खूप चर्चेत होते. दोघांचीही केमिस्ट्रीने पाहायला चाहत्यांना नक्कीच आवडते.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!