370 रुपयांच्या बिर्याणीच्या वक्तव्यावर हसणारे ते पुरुष..; अपूर्वा नेमळेकरचा तीव्र संताप

कॉमेडियन प्रणित मोरेच्या शोमध्ये हिमांशू जांग्रा नावाच्या तरुणाने 370 रुपयांची बिर्याणी गर्लफ्रेंडकडून कशाप्रकारे वसूल करायचं ठरवलं, याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावर आता अपूर्वा नेमळेकरने तीव्र संताप व्यक्त करत पोस्ट लिहिली आहे.

370 रुपयांच्या बिर्याणीच्या वक्तव्यावर हसणारे ते पुरुष..; अपूर्वा नेमळेकरचा तीव्र संताप
हिमांशू जांग्रा, अपूर्वा नेमळेकर, प्रणित मोरे
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 10, 2026 | 2:55 PM

‘बिर्याणीचे 370 रुपये भरले आहेत, मग ते वसूल करायला नको का’, महिलांबद्दल असं वादग्रस्त वक्तव्य हिमांशु जांग्रा नावाच्या तरुणाने कॉमेडियन प्रणित मोरेच्या शोमध्ये केलं. ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि त्यावरून सर्वच स्तरातून तीव्र टीका झाली. प्रणित मोरेच्या शोमध्ये हिमांशूने सांगितलं होतं की तो एका मुलीसोबत डेटवर गेला होता. तिथे त्याने 370 रुपयांची चिकन बिर्याणी खाल्ली होती. बिर्याणी खाल्ल्यानंतर त्या मुलीने घरी सोडण्याची विनंती केली तेव्हा बिर्याणीसाठी भरलेले 370 रुपये वसूल करायला हवेत, म्हणून त्याने मुलीला घरी सोडण्यास नकार दिला आणि त्याच्यासोबत एका पार्कमध्ये येण्याची विनंती केली. पार्कमध्ये गेल्यानंतर त्याने रात्र होण्याची वाट पाहिली. हा किस्सा ऐकल्यानंतर प्रणित मोरेसह उपस्थित सर्वजण हसू लागले. मात्र यावरून अत्यंत खालच्या पातळीची मानसिकता दिसून आल्याची टीका अनेकांनी केली आहे. अशातच ‘शेवंता’च्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरनेही पोस्ट लिहित सुनावलं आहे.

अमृता नेमळेकरची पोस्ट-

‘आताच प्रणित मोरेच्या शोमधील व्हायरल क्लिप पाहिली आणि मला त्या गोष्टीचा प्रचंड तिरस्कार वाटतोय. एक पुरुष अभिमानाने सांगतोय की त्याने कशाप्रकारे डेटनंतर त्याच्या गर्लफेंडवर ‘वसूली’साठी दबाव टाकला आणि तिथे उपस्थित असलेले, स्वत:ला पुरुष म्हणवणारे सर्वजण त्यावर हसत होते. ही ‘डार्क कॉमेडी’ नाही. हे सक्ती आणि हक्क गाजवणं या गोष्टी लज्जास्पदपणे सर्वसामान्य आहेत, असं म्हणणं आहे. त्या प्रेक्षकांमध्ये बसून हसणारे पुरुष हे पुरुष नाहीत. ते समाजातील परजीवी आहेत. एक प्रेक्षक म्हणून आपल्याला जागं होण्याची गरज आहे. खरं मनोरंजन काय असतं, हे हुशारीने निवडण्याची गरज आहे. अशा विषारी लोकांना मंच देणं आणि त्यांना सोशल मीडिया स्टार्स बनवणं थांबवा. उघडपणे अशा लोकांवर टीका करा आणि त्यांच्यावर बंदी आणा,’ अशी मागणी अपूर्वाने केली आहे.

दरम्यान प्रणित मोरेच्या शोमध्ये असं वक्तव्य करणाऱ्या हिमांशू जांग्रा या 23 वर्षीय तरुणाला त्याच्या नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तो स्टारविक डिझाइन या डिझाइन आणि ब्रँडिंग फर्ममध्ये वेब डेव्हलपर म्हणून काम करत होता. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कंपनीचे संस्थापक विवेक विश्वकर्मा यांनी त्याला कामावरून काढून टाकलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us