एआर रेहमान यांची पूर्व पत्नी रुग्णालयात दाखल, आता कशी आहे प्रकृती? मोठी माहिती समोर

AR Rahman Ex wife Saira: एआर रेहमान यांच्या पूर्व पत्नीला तात्काळ रुग्णालयात करण्यात आलंय दाखल, सर्जरी झाल्यानंतर कशी आहे प्रकृती? मोठी माहिती समोर..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त एआर रेहमान यांच्या पूर्व पत्नीची चर्चा...

एआर रेहमान यांची पूर्व पत्नी रुग्णालयात दाखल, आता कशी आहे प्रकृती? मोठी माहिती समोर
| Updated on: Feb 21, 2025 | 9:18 AM

AR Rahman Ex wife Saira: काही महिन्यांपूर्वी संगीतकार एआर रेहमान आणि सायरा त्यांच्या घटस्फोटामुळे चर्चेत होते. लग्नाच्या 29 वर्षानंतर एआर रेहमान आणि सायरा यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता सायरा यांच्याबद्दल मोठी बातमी समोर येत आहे. सायरा यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची सर्जरी देखील करण्यात आली आहे. याची माहिती सायरा यांच्या वकील वंदना शाह यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. वंदना शाह यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये सायरा यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती वकिलांनी दिली आहे.

वंदना शाह यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘श्रीमती सायरा रेहमान यांच्या वतीने वंदना शाह आणि असोसिएट्सने त्याच्या सद्यस्थितीबाबत एक निवेदन जारी केलं आहे. एका मेडिकल इमरजेन्सीमुळे सायरा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याची सर्जरी देखील करण्यात आली आहे. या कठीण काळात आमचे लक्ष त्याच्या लवकर बरे होण्यावर आहे.’

 

 

‘चाहत्यांव्यतिरिक्त, त्यांना मित्र, रेसुल पुकुट्टी आणि श्री. ए.आर. रहमान यांचेही मनापासून आभार मानायचे आहेत. शिवाय त्यांमी गोपनीयतेचे आवाहन देखील केलं आहे .’ सध्या वंदना शाह यांनी शेअर केलेली पोस्ट चर्चेत आहे. सायरा यांच्या प्रकृतीबद्दल कळल्यानंतर चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे.

एआर रेहमान आणि सायरा

19 नोव्हेंबर 2024 मध्ये एआर रेहमान आणि सायरा यांनी विभक्त होत असल्याची घोषणा केली. याबाबत वंदना शहा यांनी अधिकृत निवेदनही जारी केलं होतं. गेल्या काही दिवसांपासून रेहमान त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.

ए. आर. रेहमान आणि सायरा बानो यांनी 12 मार्च 1995 रोजी चेन्नईत लग्न केलं होतं. त्यांना खतीजा, रहीमा आणि अमीन ही तीन मुलं आहेत. ए. आर. रेहमान आणि सायरा बानो यांनी अरेंज मॅरेज केलं होतं.