
मुंबई | 6 डिसेंबर 2024 : निर्माता आणि अभिनेता अरबाज खान याने 24 डिसेंबर रोजी 41 वर्षीय मेकअप आर्टिस्ट शुरा खान हिच्यासोबत लग्न केलं आहेय. वयाच्या 57 व्या वर्षी अरबाज याने दुसरा संसार थाटल्यामुळे अभिनेता चर्चेच आला आहे. सध्या अरबाज याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेता दुसरी पत्नी शुरा खान हिच्यासोबत दिसत आहे. सांगायचं झालं तर, लग्नानंतर नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आणि हनीमूनसाठी अरबाज आणि शुरा भारताबाहेर गेले होते. दोघे 5 जानेवारी रोजी पुन्हा भारतात परतले. दोघांचा विमानतळावरील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये शुरा आणि अरबाज एकमेकांचा हात धरुन चालताना दिसत आहेत. दोघांना पाहिल्यानंतर पापाराझींनी दोघांना कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी गर्दी केली. पापाराझी समोर आल्यानंतर शुरा स्वतःचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत होती. सांगायचं झालं तर, दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओवर नेटकरी कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.
अरबाज आणि शुरा यांच्या व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘पत्नी नाही ही तर मुलगी जास्त वाटते…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘केव्हा पर्यंत राहणार ही पत्नी?’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘बच्ची की जान लेगा क्या’, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अरबाज आणि शुरा यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.
मलायकासोबत घटस्फोट घेतल्यानंतर आणि जॉर्जियासोबत ब्रेकअप केल्यानंतर अरबाज खानने 24 डिसेंबर 2023 रोजी शुरा खान हिच्यासोबत लग्न केलं. बहिण अर्पिताच्या घरी अरबाज आणि शुरा याचं मोठ्या थाटात लग्न झालं. अरबाज याच्या लग्नात मुलगा अरहान देखील उपस्थित होता. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.
मलायका अरोरा आणि अरबाज खान
मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी 1998 मध्ये लग्न केलं होतं. दोघांच्या लग्नाच्या चर्चा देखील सर्वत्र तुफान रंगल्या होत्या. पण लग्नाच्या 18 वर्षांनंतर अरबाज – मलायका यांच्या घटस्फोटाने चाहत्यांना धक्का बसला. दोघांना एक 21 वर्षांचा मुलगा देखील आहे. अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात अर्जुन कपूर याची एन्ट्री झाली.