AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विमान अपघातात प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन; दोन मुलींनी देखील गमावले प्राण

Plane Crash : विमान अपघातात प्रसिद्ध अभिनेत्यासह दोन चिमुकल्या मुलींनी गमावले प्राण, अपघातात पायलटचा देखील मृत्यू... झगमगत्या विश्वातून एक धाक्कादायक बातमी... अभिनेत्याच्या आणि पायलटच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर

विमान अपघातात प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन; दोन मुलींनी देखील गमावले प्राण
| Updated on: Jan 06, 2024 | 9:18 AM
Share

मुंबई | 6 डिसेंबर 2024 : झगमगत्या विश्वातून एक धाक्कादायक बातमी समोर येत आहे. विमान अपघातात एका प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन झालं आहे. भयानक अपघातात अभिनेत्याच्या दोन लहान मुलींनी देखील त्यांचे प्राण गमावले आहेत. अभिनेता आणि दोन मुलींच्या निधनाची माहिती समोर येताच कुटुंबाला आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ज्या अभिनेत्याचं विमान अपघातात निधन झालं आहे, तो दुसरा तिसरी कोणी नाही तर, हॉलिवूड अभिनेता क्रिश्चियन ओलिव्हर आहे. क्रिश्चियन ओलिव्हर 51 वर्षांचा होता. अभिनेत्याचे विमान कॅरेबियन बेटाजवळ समुद्रात कोसळले आणि दुर्घटना घडली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त विमान अपघातात निधन झालेल्या अभिनेत्याची आणि त्याच्या दोन मुलींची चर्चा रंगली आहे.

झालेल्या विमान अपघातात रॉबर्ट सॅक्स नावाच्या विमानाचा मालक आणि पायलट यांचाही मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंगल इंजिन असलेल्या विमानाने गुरुवारी दुपारी बेकिया येथील जेएफ मिशेल विमानतळातून उड्डान घेतलं होतं. जवळच्या सेंट लुसियाकडे जात असताना मोठा अपघात झाला.

अपघातात निधन झालेल्या अभिनेत्याच्या मुलींची नावे देखील समोर आली आहेत. मदिता क्लेप्सर (12) आणि एनिक क्लेप्सर (10) अशी अभिनेत्याच्या मुलींची नावे आहेत. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘उड्डान घेतल्यानंतर विमानाला काही अडचणींचा सामना करावा लागला आणि विमान समुद्रात पडला. पगेट फार्ममधील मच्छीमार मदतीसाठी त्यांच्या बोटीतून घटनास्थळी धावत आले. तेव्हा चारही मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.’

सध्या संबंधीत घटनेची अधिक चौकशी सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पायलटने टेकऑफनंतर लगेच टॉवरवर रेडिओवर अडचणीत असल्याचा मेसेज पाठवला होता. तोच पायलटचा शेवटचा संदेश ठरला… अभिनेत्यासह दोन मुली आणि पायलटचा देखील मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

अभिनेता क्रिश्चियन ओलिव्हर याने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं होतं. ऑलिव्हरने नुकताच 20 डिसेंबर रोजी बाई लिंग अभिनीत आणि निक लियॉन दिग्दर्शित, फॉरएव्हर होल्ड युवर पीस या सिनेमात त्याचे अंतिम सीन शूट केले होते. आता अभिनेत्याच्या निधनानंतक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना