Arjun Rampal : 7 वर्षांचं नातं, दोन मुलं आणि आता लग्न! अर्जुन रामपाल-गॅब्रिएलाचा नवा अध्याय सुरू

अभिनेता अर्जुन रामपालने त्याची प्रेयसी गॅब्रिएला डेमेट्रियाड्ससोबत गोव्यात लग्न केलं. तब्बल सात वर्षांच्या डेटिंगनंतर आणि दोन मुलांनंतर त्यांनी विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. या लग्ननोंदणी सोहळ्याला मोजक्या मित्रांनी हजेरी लावली. अर्जुनचं हे दुसरं लग्न आहे.

Arjun Rampal : 7 वर्षांचं नातं, दोन मुलं आणि आता लग्न! अर्जुन रामपाल-गॅब्रिएलाचा नवा अध्याय सुरू
Arjun Rampal
| Updated on: Aug 21, 2026 | 7:54 PM

‘धुरंधर’ला मिळालेल्या तूफान यशामुळे, आणि त्यातील भूमिकेमुळे चर्चेत आलेला अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal) याच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. तब्बल 7 वर्ष डेट केल्यानंतर अभिनेता अर्जुन रामपालने आपली गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रियाड्सशी लग्न केलं. गोव्यात त्यांनी अधिकृतपणे लग्नाची नोंदणी केली. शुक्रवारी दुपारी सुमारे 4 वाजता हे जोडपं उत्तर गोव्यातील मापुसा येथील सब-रजिस्ट्रार कार्यालयात पोहोचलं. त्यावेळी दोघेही कॅज्युअल पोशाखातत होते. लग्नगाठ बांधताना त्यांच्यालोबत त्यांचे काही मोजके मित्र होते. अर्जुन -गॅब्रिएला यांच्या लग्नाची नोंदणी गोव्याच्या UCC अंतर्गत करण्यात आली असं सब-रजिस्ट्रार सूरज वर्नेकर यांनी सांगितलं. बराच काळ लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर डिसेंबर 2025 मध्ये या दोघांनी साखरपुडा केला होता. तर आज ते लग्नबंधनात अडकले. त्यामुळे अर्जुनचे चाहते खूप खुश असणार हे नक्की.

काही काळापूर्वी अर्जुन रामपाल हा रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टमध्ये आला होता, तेव्हा त्याने गॅब्रिएला डेमेट्रियाड्ससोबतच्या साखरपुड्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. या खास क्षणाची झलक पॉडकास्टच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली होती. त्यासोबत, “शहरातील सर्वात कूल कपलला शुभेच्छा @gabriellademetriades @rampal72” अशी कॅप्शनही देण्यात आली होती. अर्जुन -गॅब्रिएला 2018 पासून एकत्र रहात आहेत.

अर्जुन रामपाल आणि गॅब्रिएलाला किती मुलं ?

अर्जुन रामपाल आणि गॅब्रिएला डेमेट्रियाडेस यांना दोन मुलं आहेत. 2019 साली त्यांचा मोठा मुलगा अरिक याचा जन्म झाला, तर दुसरा मुलगा अराव हा 2023 साली जन्माला आला. दोघेही अनेकदा आपल्या मुलांसोबत दिसतात. सार्वजनिक व्यक्ती असूनही त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत बरीच गोपनीयता राखली. गॅब्रिएला डेमेट्रियाड्सचा जन्म आणि बालपण दक्षिण आफ्रिकेत झालं. तिने अवघ्या 16व्या वर्षी मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर तिने फॅशन डिझाइनचे शिक्षण घेतलं.

 

अर्जुनचं दुसरं लग्न

अर्जुन रामपालचं हे दुसरं लग्न आहे. त्याआधी माजी सुपरमॉडेल आणि उद्योजिका मेहर जेसिया हिच्याशी त्याचा विवाह झाला होता. दोघांनी 1998 साली लग्न केलं आणि त्यांना माहिका आणि मायरा या दोन मुली आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us