मुद्द्यावर बोला, धर्म का मध्ये आणता ? ‘जय श्री राम’ वरून विशाल आदित्य सिंहला अर्शी खानने सुनावलं
बिग बॉसच्या माजी स्पर्धकांमध्ये सध्या मोठा वाद सुरू आहे. विशाल सिंगने आसिम रियाजसोबतच्या वादाला 'जय श्री राम' म्हणत धार्मिक वळण दिले. यावर अर्शी खानने तीव्र नाराजी व्यक्त केली.

बिग बॉसच्या (Bigg Bossघरातून बाहेर पडलेल्या, काही माजी स्पर्धकांमध्ये गेल्या बऱ्याच काळापासून वाद सुरू आहे. आधी बिग बॉसचा माजी स्पर्धक विशाल आदित्य सिंह आणि आसिम रियाज यांचं भांडण झालं, ते चर्चेत होते. तुला मानसिक समस्या आहे अशी टीका करत, तू मानसोपचरा तज्ञाकडे जायला पाहिजेस असं आसिमने विशालला सुनावलं होतं. तर विशाल सिंगनेही त्याला चोख प्रत्युत्तर देत पलटवार केला होता. मात्र, या वादाला विशालने धर्माचा रंग दिला. विशालने आपल्या पोस्टमध्ये आसिमला उद्देशून “आसिम भाई, बोलो जय श्री राम” असे लिहिलं होतं. पण याला धार्मिक रंग दिल्यामुळे बिग बॉसची आणखी एक माजी स्पर्धक भडकली आहे. बिग बॉसमध्ये झळकलेली, अर्शी खानने विशालच्या या वक्तव्यावरून नाराजी व्यक्त केली आहे. तिने या आक्षेप घेतला आहे.
अर्शीचा विशालवर पलटवार
विशाल आणि आसिमच्या भांडणानंतर आता, बिग बॉसची माजी स्पर्धक अर्शी खान हिने प्रतिक्रिया दिली आहे. विशालच्या “ जय श्री राम ” या कमेंटचा उल्लेख करत आर्शीने त्याच्यावर जोरदार टीका केली आहे. फिल्मीज्ञानला दिलेल्या मुलाखतीत अर्शी खानने विशालच्या या वक्तव्यावर म्हटलं की, एखादी मुस्लिम व्यक्ती “जय श्री राम” म्हणू शकता, असा अर्थ काढणं चुकीचं आहे.
पुढे ती म्हणाली, ‘ मी त्याची स्टोरी पाहिली होती. पण मला ते चुकीचं वाटलं. आम्हीही जय श्रीराम म्हणू शकतो, आम्हीपण भारतात राहतो. त्याचप्रमाणे अल्लाहू अकबरही म्हणू शकतो. प्रत्येकजण हे बोलू शकतो.त्यामुळे आमचा सन्मान कमी होत नाही. आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो. तुम्हाला नेमके काय सिद्ध करायचे आहे? हेच ना की एखाद्या मुस्लिम व्यक्तीला या सर्व गोष्टी आवडत नाहीत? हे चुकीचे आहे ” असं तिने सुनावलं.
View this post on Instagram
याबाबत बोलताना अर्शी पुढे म्हणाली की , “ तु्म्हाला ( विशाल) जर आसिम रियाजबद्दल बोलायचं असेल तर त्याच्याशी संबंधित मुद्द्यावर बोला. यात धर्म मध्ये आणण्याची गरज नाही. तुम्हाला नेमके काय सिद्ध करायचे आहे? एखादा मुस्लिम व्यक्ती या गोष्टी स्वीकारत नाही, हे दाखवायचे आहे का? हे चुकीचे आहे. आम्हीही जय श्री राम म्हणू शकतो. आम्ही भारतात राहतो आणि या देशाचे अन्न खातो.” असं तिने पुढे म्हणत आपला मुद्दा स्पष्टपणे मांडला.
हिमांशी खुराना आणि आसिमच्या नात्यावरही केलं भाष्य
बिग बॉसची माजी स्पर्धक हिमांशी खुराना आणि आसिम यांच्या नात्यावरही अर्शीने कमेंट केली. ‘ आसिम मुस्लिम आहे हे हिमांशीला आधीपासूनच माहीत होतं. त्यामुळे त्याच्या धर्माशी संबंधित काही गोष्टी स्वीकाराव्या लागू शकतात, याची तिला जाणीव असायला हवी होती. प्रत्येक व्यक्ती एवढ्या मोकळ्या विचारांची नसते ना की ते सगळ्या गोष्टी सहज स्वीकारतील. प्रत्येकजण शाहरुख खान आणि गौरी खानसारखा होऊ शकत नाही,’ असं अर्शीने म्हटलं.
हिम्मत असेल तर इंडस्ट्रीतील खरे मुद्दे उघड करा
यावेळी बोलताना अर्शीने सध्याच्या सेलिब्रिटी पॉडकास्ट संस्कृतीवरही टीका केली. तिच्या मते, अनेक सेलिब्रिटी पॉडकास्टमध्ये जाऊन एकमेकांविषयी चर्चा आणि चुगली करताना दिसतात. ‘ पण तुमच्यात जर खरंच हिंमत असेल तर या इंडस्ट्रीतल्या मोठ्या मुद्यांवर बोला ना. कास्टिंग काऊच बद्दल बोला, ते उघडकीस आणा. पण जर तुम्ही फक्त निवडक लोकांवर बोलत असाल, तर त्याला काही अर्थ नाही. तुमच्यात खरंच धाडस असेल तर सगळ्यांबद्दल बोला.’ असं म्हणत तिने सेलिब्रिटींना थेट आव्हान दिलं.
