
Arti Singh Buying Vegetable : अभिनेता गोविंदाची भाची आणि अनेक टीव्ही मालिकांमध्ये झळकलेली अभिनेत्री आरती सिंह हिचं गेल्या वर्षी लग्न झालं. तेव्हापासून ती फारशी लाइमलाइटमध्ये झळकली नसली तरी ती सोशल मीडियावर बरीच ॲक्टिव्ह असते. दीप चौहान याच्यासोबत तिने गेल्या वर्ष धूमधडाक्यात लग्न केलं. त्यांची मेहंतदी, हळद, लग्न , रिसेप्शन यांचे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरलही झाले होते. ती वैवाहिक जीवनात खूप खुशही आहे. बरेच वेळा ती तिचे, पतीसोबतचे फोटोज, व्हिडीओज शेअर करत असते.
आरतीने शेअर केला व्हिडीओ
नुकताच तिने आणखी एक व्हिडीओ शेअर केला, त्यावरून अनेकांनी तिचं कौतुक केलं पण काहींनी तिला ट्रोलही केलं. खरंतर ती, पती दीपकसह भाजी खरेदी करायला गेली होती, तिथला हा व्हिडीओ आहे. त्यासोबत तिने खास कॅप्शनही लिहीली. ” माझा रविवार, स्वयंपाक करणं, भाजी खरेदी करणं हे माझ्यासाठी थेरपीसारखं आहे. दीपकही माझ्यासोबतं (हे काम) आनंदाने करतात. कारण हे घरं आमचं(दोघांचं) आहे. दोघांनी सोबत मिळून काही काम केलं तर प्रेम वाढतं. तुम्ही सहमत आहात का ?” असा प्रश्नही आरतीने विचारला आहे.
भाजी खरेदी करायला गेलेली आरती आणि तिचा पती दोघांनीही ट्विनिंग केलं होतं, ते दोघंही काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये दिसले. आरतीने बरीच भाजी विकत घेतली, थोडीफार घासाघीसही केली. या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडीओ तिने शेअर केला असून त्यावर नेटकऱ्यांच्या विविध कमेंट्स आल्या आहेत. काही लोकांनी त्यांचं कौतुक केलं खरं पण काहींनी या व्हिडीओवरून तिला ट्रोल करत काही खोचक सवालही विचारले. भाजी घ्यायला जाताना कॅमेरामन सोबत घेऊन गेली होतीस का, असा सवाल काही लोकांनी तिला विचारला.
व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स
एका यूजरने लिहिले- तुम्ही स्वतः भाज्या खरेदी करता का? तर दुसऱ्याने लिहीलं की – व्वा, तुम्ही स्थानिक विक्रेत्यांकडून सातत्याने भाज्या खरेदी करता. हे पाहून आनंद झाला. आरती सिंग आणि दीपक चौहान यांचे लग्न 25 मार्च 2024 रोजी मुंबईत झाले. हे लग्न इस्कॉन मंदिरात झाले. अभिनेता गोविंदा, बिपाशा बसू, करण सिंग ग्रोव्हर आणि रश्मी देसाई सारखे स्टार त्यांच्या लग्नाला उपस्थित होते. त्यांच्या लग्नाची खूप चर्चा झाली.