
Ashish Kapoor: प्रसिद्ध टीव्ही अभिनेता आशीष कपूर याच्यावर एका महिलेने बलात्काराचे आरोप केले आहे. दिल्ली पोलिसांनी अभिनेत्याला बुधवारी अटक केली आहे. आता समोर येत असलेल्या माहितीनुसार अभिनेत्याती पोटेंसी टेस्ट केली जाणार आहे. सांगायचं झालं तर, एका महिलेने आशिष कपूरवर आरोप केला आहे की, 2 ऑगस्ट रोजी दिल्लीत एका घरात पार्टी आयोजित करण्यात आली होती. या दरम्यान, अभिनेत्याने वॉशरूममध्ये तिच्यावर बलात्कार केला. आता आशीष याची पोटेंसी टेस्ट करणार असल्याची माहिती समोर येत आहे…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि अशिष कपूर यांची इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. त्यानंतर दोघांची मैत्री झाली आणि पर्टीची योजना आखण्यात आली… या पार्टीत पीडित महिला देखील सामिल होती. सुरुवातीला पीडितेने आशिष कपूर, त्याचा मित्र आणि दोन अज्ञात व्यक्तींनी तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. एवढंच नाही तर, एका महिलेने तिला मारहाण देखील केली. नंतर, पीडितेने तिचे म्हणणं बदललं आणि सांगितलं की, फक्त आशिषनेच तिच्यावर बलात्कार केला.
यापूर्वी, घटनेचा व्हिडीओ देखील शूट करण्यात आल्याचा दावा पीडितेने केला होता. पण पोलिसांना अद्याप असा कोणताही व्हिडिओ सापडलेला नाही. सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांच्या तपासणीत असं दिसून आलं आहे की आशिष कपूर आणि ती महिला पार्टी दरम्यान एकत्र वॉशरूमला गेले होते.
आशीष कपूर प्रसिद्ध आणि लोकप्रिय टीव्ही अभिनेता आहे. अभिनेत्याने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘देखा एक ख्वाब’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं. शिवाय त्याने सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. ‘कुर्बान’, ‘टेबल नंबर 21’ आणि ‘इनकार’ यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं.
लैंगिक शोषणाच्या प्रकरणांमध्ये, पॉन्टेंसी टेस्ट केली जाते. खरं तर, अशी अनेक प्रकरणं आहेत ज्यात आरोपी शारीरिक क्षमतेचा हवाला देऊन म्हणतो की त्याच्यात शारीरिक संबंध ठेवण्याची ताकद नाही. ही क्षमता वैद्यकीय तपासणीद्वारे निश्चित केली जाते. ही चाचणी 10 ते 15 मिनिटांत व्यक्तीच्या लैंगिक संबंध ठेवण्याच्या क्षमतेबद्दल सहजपणे सांगते. त्यामुळे आता याप्रकरणात काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.