AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5 लाख 24 हजार लोक संकटात, 763 गावं पाण्याखाली…. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सलमान खान पुढे, पदार्थांपासून सॅनिटरी पॅड्सचं कसं करतोय वाटप?

Assam Floods : आसाममध्ये सध्या परिस्थिती फार भयानक आहे... पुरामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. पुरात 68 जणाचं प्राण गेले असून, 5 लाख 24 हजार लोक संकटात आहेत. तर 763 गावं पाण्याखाली आहेत. अशात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अभिनेता सलमान खान याने पुढाकार घेतला आहे.

5 लाख 24 हजार लोक संकटात, 763 गावं पाण्याखाली.... पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सलमान खान पुढे, पदार्थांपासून सॅनिटरी पॅड्सचं कसं करतोय वाटप?
अभिनेता सलमान खान
| Updated on: Jul 29, 2026 | 8:31 AM
Share

Assam Floods : आसाममध्ये आलेल्या पुरामुळे सर्वत्र प्रचंड हाहाकार पाहायला मिळत आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, पुरात पुरात 68 जणाचं प्राण गेले असून, 5 लाख 24 हजार लोक संकटात आहेत. तर 763 गावं पाण्याखाली आहेत. आलेल्या या मोठ्या संकटामुळे शहरं पाण्याखाली गेली असून, पुरात अडकलेल्या लोकांच्या बचावासाठी आणि मदतीसाठी अनेक ठिकाणाहून मदत पोहोचवली जात आहे. अभिनेता सलमान खान देखील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आला आहे.

मदतीसाठी पुढे आला सलमान खान…

सलमान खान याच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी या सुपरस्टारने आसाममधील आपल्या एका फॅन क्लबशी हातमिळवणी केली आहे. ही मदत त्याच्या ‘बीइंग ह्युमन’ (Being Human) या एनजीओमार्फत पोहोचवली जात आहे. या उपक्रमाची सुरुवात बिस्किटे, गूळ, मुरमुरे आणि ब्रेड यांसारख्या ‘रेडी-टू-ईट’खाद्यपदार्थांच्या वाटपाने झाली. एवढंच नाही तर, सॅनिटरी पॅड्सचं देखील वाटप करण्यात येत आहे.

सांगायचं झालं तर, ही पहिली वेळ नाही, जेव्हा सलमान खान गरजूंच्या मदतीसाठी पुढे आला आहे. याआधी देखील त्याने अनेकांची मदत केली आहे. यापूर्वीही अनेक प्रसंगी भाईजानने संकटात सापडलेल्यांना मदत केली आहे. गेल्या वर्षी पंजाबच्या अनेक भागांत मुसळधार पावसामुळे पूर आला होता, ज्यामुळे अनेकांची पिके आणि घरे उद्ध्वस्त झाली होती; त्यावेळीही सलमान मदतीसाठी पुढे आलेला…

सलमान खान याच्यानंतर अन्य बॉलिवूड सेलिब्रिटी येत आहेत पुढे…

पुरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी निधी एकत्र करण्यासाठी बॉलिवूड पुढे आलं आहे. 25 जुलै रोजी, आसामी गायक पापन याने विशाल ददलानी, दिव्या कुमार आणि निलोत्पल बोरा यांच्यासमवेत इन्स्टाग्रामवर एका ‘लाइव्ह चॅरिटी कॉन्सर्ट’चं आयोजन केलं आणि सुरू असलेल्या मदतकार्यासाठी योगदान देण्याचं आवाहन प्रेक्षकांना केलं. पुरामुळे सुमारे 7 लाखांहून अधिक लोक बाधित झाले असून, राज्यभरातील बचाव आणि पुनर्वसन कार्यात मदत करण्यासाठी अनेक सेलिब्रिटी आणि मानवतावादी संस्था एकत्र आल्या आहेत.

Follow Us
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान
ठाण्याची अवस्था बीडपेक्षाही वाईट! अविनाश जाधवांचा सरकारला इशारा, लव
ठाण्याची अवस्था बीडपेक्षाही वाईट! अविनाश जाधवांचा सरकारला इशारा, लवकरच आंदोलनाचा इशारा
एकनाथ शिंदे मीनाक्षी शिंदेंना का वाचवत आहेत? राम पूर्णेकरांचा थेट सवाल
Ram Purnekar : एकनाथ शिंदे मीनाक्षी शिंदेंना का वाचवत आहेत? राम पूर्णेकरांचा थेट सवाल
दिवाळीपूर्वी लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट! 344 कोटींचा निधी मंजूर,
दिवाळीपूर्वी लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट! 344 कोटींचा निधी मंजूर, खात्यात किती रुपये होणार जमा?
कर्जतमधील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरेंची आज सभा
Raj Thackeray Sabha Update : कर्जतमधील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरेंची आज सभा