AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ : अभिषेक शर्माचं काल तुफानी शतक, आज मिळाली गुड न्यूज

IND vs NZ : टीम इंडियाचा ओपनर अभिषेक शर्माने काल तुफानी शतक झळकावलं. त्याने न्यूझीलंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. आता अभिषेक शर्माला त्याचं इनाम सुद्धा मिळालं आहे. अभिषेकने 35 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं होतं.

IND vs NZ : अभिषेक शर्माचं काल तुफानी शतक, आज मिळाली गुड न्यूज
Abhishek sharma
| Updated on: Oct 28, 2026 | 4:56 PM
Share

वेलिंग्टनमध्ये न्यूझीलंड विरुद्ध जोरदार शतक झळकवल्यानंतर अभिषेक शर्मा आयसीसी मेन्स टी20 इंटरनॅशनल फलंदाजांच्या रँकिंगमध्ये नंबर 1 वर पोहोचला आहे. भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरचा संघर्ष सुरु आहे. त्यामुळे त्याच्या क्रमवारीत घसरण होऊन तो 9 व्या नंबरवर आला आहे. अभिषेकने मंगळवारी न्यूझीलंड विरुद्ध तिसऱ्या टी20 इंटरनॅशनलमध्ये 38 चेंडूत 113 धावा फटकावल्या. त्याने 35 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. त्यामुळे भारताने सहाविकेटने विजय मिळवला. पाच सामन्यांच्या सीरीजमध्ये 3-0 अशी विजयी आघाडी घेतली.

अभिषेक शर्माच्या तुफानी इनिंगने रँकिंगमध्ये महत्वाची भूमिका बजावली. त्याने ईशान किशनला मागे टाकलं. जुलै महिन्यात आयर्लंड विरुद्ध टी20 सीरीजनंतर ईशान टॉपवर आलेला. ईशानची आता तिसऱ्या स्थानावर घसरण झालीय. पाकिस्तानचा साहिबजादा फरहान ताज्या रँकिंगमध्ये दुसर्‍या स्थानावर आहे. अभिषेक शर्मा पहिल्यांदा जुलै 2025 मध्ये टी20 मधला नंबर 1 फलंदाज बनला होता. त्यावेळी त्याने ट्रेविस हेडला मागे टाकलेलं. तो जवळपास वर्षभर त्या स्थानावर होता. टी20 वर्ल्ड कपमधील चांगल्या प्रदर्शनामुळे ईशान किशन नंबर 1 बनला.

श्रेयस अय्यरचं प्रदर्शन या उलट

अभिषेक शर्मा सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. न्यूझीलंडने दिलेल्या 198 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने अलीकडे 13.2 ओव्हर्समध्ये 199 धावा केल्या. अभिषेक आणि युवा ओपनर वैभव सूर्यवंशीने धमाकेदार सुरुवात केली. सूर्यवंशीने 19 चेंडूत 45 धावा फटकावल्या. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 133 धावांची भागीदारी केली. अभिषेकने नऊ चौकार आणि 11 षटकार ठोकून 298 च्या स्ट्राइक रेटने आपली इनिंग संपवली. सीरीजच्या पहिल्या दोन सामन्यात तो 29 आणि 27 धावांची छोटी उपयुक्त खेळी केलेली. अभिषेक शर्मा त्याच्या पावर हिटिंगमुळे टॉपवर पोहोचलाय. श्रेयस अय्यरचं प्रदर्शन या उलट आहे.

टी20 रँकिंगमध्ये टॉप पाचमध्ये पोहोचला

श्रेयस अय्यरने या महिन्याच्या सुरुवातीला लखनऊमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध 43 चेंडूत नाबाद 102 धावा करुन धमाकेदार शतक झळकवलं होतं. या इनिंगने तो टी20 रँकिंगमध्ये टॉप पाचमध्ये पोहोचला. भारतीय कॅप्टन अय्यरला न्यूझीलंडमध्ये ती लय कायम टिकवता आली नाही. पहिल्या टी20 मध्ये 42 धावा केल्यानंतर अय्यरने पुढच्या दोन सामन्यात फक्त सात आणि पाच धावा केल्या. वेलिंग्टनमध्ये फलंदाजी करताना त्याला अडचणीचा सामना करावा लागला. 10 चेंडूत 5 धावा केल्यानंतर मिचेल सँटनरने त्याची विकेट काढली.

Follow Us
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान
ठाण्याची अवस्था बीडपेक्षाही वाईट! अविनाश जाधवांचा सरकारला इशारा, लव
ठाण्याची अवस्था बीडपेक्षाही वाईट! अविनाश जाधवांचा सरकारला इशारा, लवकरच आंदोलनाचा इशारा
एकनाथ शिंदे मीनाक्षी शिंदेंना का वाचवत आहेत? राम पूर्णेकरांचा थेट सवाल
Ram Purnekar : एकनाथ शिंदे मीनाक्षी शिंदेंना का वाचवत आहेत? राम पूर्णेकरांचा थेट सवाल
दिवाळीपूर्वी लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट! 344 कोटींचा निधी मंजूर,
दिवाळीपूर्वी लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट! 344 कोटींचा निधी मंजूर, खात्यात किती रुपये होणार जमा?
कर्जतमधील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरेंची आज सभा
Raj Thackeray Sabha Update : कर्जतमधील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरेंची आज सभा