
Katrina Kaif Vicky Kaushal baby : विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ लवकरच त्यांच्या पहिल्या बाळाचं जगात स्वागत करणार आहेत. काही दिवसांपूर्वी दोघांनी एक फोटो पोस्ट करत चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली. दरम्यान, विकी आणि कतरिना यांना मुलगा होणार की मुलगी याबद्दल प्रसिद्ध ज्योतिषीने मोठं भाकिक केलं आहे. त्यांनी ट्विट करत भाकित केलं आहे. ‘विकी आणि कतरिना यांचं पहिलं बाळ मुलगी असेल…’ असं ज्योतिषीने सांगितलं आहे.
अनिरुद्ध कुमार मिश्रा नावाच्या एका ज्योतिष्याने मोठे भाकीत केलं आहे. अनिरुद्ध कुमार मिश्रा यांनी केल्या भाकितानुसार “विक्की कौशल आणि कॅटरीना कैफचे पहिलं अपत्य एक मुलगी असेल.” त्यांच्या ट्विटमुळे चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
सांगायचं झालं तर, कौशल आणि कैफ कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण असताना विकी कौशल याचा भाऊ आणि अभिनेता सनी कौशल याने घरात सध्या कसं वातावरण आहे… ‘कुटुंबातील प्रत्येक जण आनंदी आहे पण भीती देखील वाटत आहे… प्रत्येक जण विचार करत आहे की, पुढे कसं आणि काय होणार.. आता फक्त त्याची प्रतिक्षा आहे…’ असं सनी कौशल म्हणाला.
The first child of Vicky Kaushal and Katrina Kaif will be a daughter. pic.twitter.com/2wjWk7SaKN
— Anirudh Kumar Mishra (Astrologer) (@Anirudh_Astro) October 8, 2025
सांगायचं झालं तर, गेल्या अनेक महिन्यांपासून कतरिना हिच्या प्रेग्नेंसीच्या चर्चांनी जोर धरला होता. पण यावर कतरिना आणि विकी यांनी कायम मौन बाळगलं… अखेर काही दिवसांपूर्वी कतरिना आणि विकी यांनी प्रेग्नेंसीची घोषणा केली आणि चाहत्यांचा आनंद शिगेला पोहोचला…
फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये अभिनेत्री म्हणाली, ‘आपण आनंद आणि प्रेमाने आयुष्याचा एक नवीन अध्याय सुरू करणार आहोत.’ पोस्टनंतर कतरिना आणि विकी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कतरिना कैफ तिच्या गरोदरपणाच्या तिसऱ्या ट्राइमेस्टर आहे. असा दावा केला जात आहे की ती 15 ते 30 ऑक्टोबर बाळाल जन्म देऊ शकते… पण याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.