
90 च्या दशकात प्रदर्शित झालेल्या काजोल आणि शाहरुख खानच्या डीडीएलजे या चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीतील अशा चित्रपटांच्या यादीत स्वतःचे स्थान निर्माण केले जे केवळ सदाबहारच नाहीत तर चित्रपटगृहात सर्वात जास्त काळ टिकणारे चित्रपट देखील आहेत. हा चित्रपट कितीही परिपूर्ण दिसत असला तरी प्रत्यक्षात त्याचे शूटिंग निर्मात्यांसाठी तितके सोपे नव्हते.
त्या काळात कलाकारांसाठी व्हॅनिटी व्हॅन नव्हत्या. कपडे बदलण्यासाठीही जागा नव्हती. मग इतक्या मोठ्या चित्रपटात अभिनेत्रीने कसे काम केले, याचा खुलासा करण जोहरने स्वत:च केला आहे.
काजोलने झाडामागे तिची साडी बदलली
अलिकडेच एका मुलाखतीत करण जोहरने ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’च्या सेटवर काम करण्याचा अनुभव शेअर केला. दिग्दर्शक आदित्य चोप्राचा सहाय्यक असलेला करण जोहरने स्वित्झर्लंडमधील शूटिंगबद्दलचे किस्से सांगितले. करणने सांगितले की त्यांची 21 जणांची टीम एका बसमध्ये प्रवास करायची. जिथे डीडीएलजेचे दिग्दर्शक चांगल्या ठिकाणी शूटिंग करण्यासाठी अचानक थांबायचे.
चित्रपटाचं बजेट तेवढं नव्हतं
काजोलबद्दल बोलताना, करणने स्वित्झर्लंडमध्ये शूटिंग दरम्यान अभिनेत्री कशी कपडे बदलायची तेही सांगितले तो म्हणाला, “आम्ही काजोलला झाडामागे घेऊन जायचो आणि तिला साडी नेसवायला लावायचो.”कारण तेव्हा व्हॅनीटी वैगरे नसायच्या किंवा चित्रपटाचं बजेट तेवढं नव्हतं की अनेक खर्च उचलेल जातील त्यामुळे अभिनेत्रींसाठी असं काही विशेष व्यवस्था करणे शक्य नसते.
शाहरुखबद्दल करणचा खुलासा
दिग्दर्शकाने पुढे सांगितले की शाहरुख खान त्याच्या शूटिंगसाठी कुठेही कपडे बदलत असे. त्यावेळी त्याच्याकडे जास्त पैसे नव्हते. करण जोहरने असेही सांगितले की 1995 च्या क्लासिकच्या शूटिंग दरम्यान शाहरुख खान आणि काजोलसह डीडीएलजे टीमने फक्त आवश्यक वस्तू घेतल्या होत्या कारण त्यावेळी फारशा सुविधा नव्हत्या.
‘सर्वात मोठा धडा’
‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’च्या सेटवर एक वर्ष काम करणाऱ्या करण जोहरने त्या सर्व अनुभवाला त्याच्या आयुष्यातील ‘सर्वात मोठा धडा’ म्हटले. गर्दीचे व्यवस्थापन करणे, अभिनेत्रींसाठी पोशाखांची व्यवस्था करणे आणि रेल्वे स्टेशनवरून कमी किमतीत त्यांच्यासाठी वस्तू खरेदी करणे ही त्याची जबाबदारी असल्याचे करण जोहर म्हणाले.
‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा आदित्य चोप्राचा हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण होतं. या चित्रपटात दिवंगत अमरीश पुरी, फरीदा जलाल, अनुपम खेर, मंदिरा बेदी, सतीश शाह आणि इतर कलाकारही होते. 1995 च्या या चित्रपटात करण जोहरने शाहरुखच्या ऑन-स्क्रीन मित्राची छोटीशी भूमिका साकारली होती.