
बॉलिवूडमधील मल्लिका शेरावत हे नाव कुणासाठीच नवीन नाही. तिनं अनेक चित्रपटांमध्ये उत्तम भूमिका साकारल्या आहेत. या व्यतिरिक्त मल्लिकानं अभिनेत्रीनं तिच्या कारकीर्दीत रोमँटिक ते नकारात्मक पर्यंतच्या भूमिका साकारल्या आहेत.

आता ती नवीन वेब सीरिज RKRKAY मुळे चर्चेत आहे, ज्यामध्ये ती गुलाबोच्या भूमिकेत दिसली आहे. या अभिनेत्रीने नुकतंच या चित्रपटाविषयी आणि तिच्या करिअरच्या आलेखाविषयी चर्चा केली आहे.

तिनं नुकतंच दिलेल्या मुलाखतीत सांगितले होतं की या चित्रपटात काम करण्यासाठी मला ऑडिशन द्यावं लागलं. आजपर्यंत मी माझ्या करिअरच्या कोणत्याही चित्रपटात ऑडिशनशिवाय काम केलं नाही. मला कास्ट करण्यापूर्वी जॅकी चॅनने बर्याच अभिनेत्रींचे ऑडिशन घेतले होते.

ही नेहमीचीच एक प्रक्रिया आहे, मात्र मला चांगलं वाटलं असतं की ही प्रक्रिया स्टारकिड्ससाठी सुद्धा सारखीच असती. मात्र तसं नाही. रजतने जेव्हा या चित्रपटासाठी माझ्याकडे संपर्क साधला तेव्हा माझी लूक टेस्ट आणि स्क्रीन टेस्ट झाली. तसेच, त्यांनी मला असंही सांगितलं की जर मी या भूमिकेसाठी योग्य नसेल तर तो या भूमिकेसाठी दुसर्या कोणाची निवड करेल.

RKRKAY व्यतिरिक्त, मल्लिका आणखी एका वेब सीरिजचा भाग आहे. लवकरच ही सीरिज रिलीज होणार आहे. या वेब सीरिजमध्ये काम करणं मला आवडलं. असल्याचे ती म्हणाली.

मल्लिका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती तिचे अनेक ग्लॅमरस आणि बोल्ड फोटो सोशळ मीडियावर शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर तिची चांगली फॅन फॉलोइंग आहे.