Awarapan 2 Box Office: ‘आवारापन 2’चा बॉक्स ऑफिसवर वेग मंदावला, 200 कोटींचं स्वप्न पूर्ण होणार?

Awarapan 2 Box Office : बॉलीवुड अभिनेता इम्रान हाश्मीच्या 'आवारापन 2' या सिनेमाचीस्लो बट स्टेडी अशी प्रगती सुरू आहे. चित्रपट रिलीज होऊन 6 दिवस झाले असून आत्तापर्यंत किती कमाई झाली ? जाणून घेऊया.

Awarapan 2 Box Office: ‘आवारापन 2’चा बॉक्स ऑफिसवर वेग मंदावला, 200 कोटींचं स्वप्न पूर्ण होणार?
आवारापन 2 चं कलेक्शन किती ?
| Updated on: Aug 20, 2026 | 2:14 PM

Awarapan 2 Box Office : शिवम पंडितची बॉक्स ऑफीस एंट्री धमाकेदार झाली आहे, कदाचित त्यानेही त्याचा असा विचार केला नसेल. पहिला चित्रपट त्यावेळी फारशी कमाई करू शकला नव्हता,मात्र नंतर त्याला कल्ट चित्रपटाचा दर्जा मिळाला. मात्र इम्रान हाश्मीच्या या चित्रपटाच्या सिक्वेलची चाहते कित्येक दिवसांपासून वाट पहात होते. ‘आवारापन 2’ची कहाणी काही फार वेगळी, विशेष नाही, पण तरीही बहुसंख लोक या चित्रपटाशी कनेक्ट होताना दिसतायत. ज्याचा फायदा पार्ट 2 च्या रिलीज नंतर होत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडतोय. याचदरम्यान ‘आवारापन 2’ च्या सहाव्या दिवसाचं बॉक्स ऑफीस कलेक्शन समोर आलं आहे. या चित्रपटाने 6.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली सुरुवात केल्यानंतर आता कमाईचा वेग थोडा मंदावला आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, सहाव्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत तब्बल 30.8 टक्क्यांची घट झाली आहे. मंगळवारी 9.75 कोटी रुपये कमावणाऱ्या या चित्रपटाने आता 6.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे, सहाव्या दिवशी चित्रपटाचे तब्बल 11,071 शोज झाले, तर ऑक्युपन्सी रेट 16 टक्के होता. आतापर्यंतची ही चित्रपटाची सर्वात कमी कमाई ठरली आहे. मात्र, कमाईचा आकडा घटला असला तरी चित्रपटाने भारतात आतापर्यंत 107.50 कोटी रुपयांचा नेट कलेक्शन केलं आहे.

200 कोटींचं लक्ष्य किती दूर?

‘आवारापन 2’ची ग्रॉस कमाई आत्तापर्यंच 128.29 कोटी रुपये झाली आहे. जगभरातील बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने 153.59 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. त्यामुळे आता 200 कोटींच्या क्लबपासून चित्रपट फार दूर नाही. परदेशातील कमाईही चित्रपटासाठी फायदेशीर ठरत आहे. सहाव्या दिवशी ओव्हरसीज मार्केटमधून चित्रपटाने 1.50 कोटी रुपये कमावले असून, आतापर्यंत परदेशातून तब्बल 25.30 कोटी रुपये जमा झाले आहेत. चित्रपटाने ‘ पहिल्याच दिवशी 22 कोटी रुपये कमावत जोरदार सुरुवात केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 33.75 कोटी, तिसऱ्या दिवशी 26 कोटी, चौथ्या दिवशी 9.25 कोटी, पाचव्या दिवशी 9.75 कोटी आणि सहाव्या दिवशी 6.75 कोटी रुपयांची कमाई केली.

मात्र असं असलं तरी आता खरी नजर वीकडेजच्या कलेक्शनवर असणार आहे. जर चित्रपटाची दररोजची कमाई 5 कोटी रुपयांच्या वर टिकून राहिली, तर 200 कोटींचा टप्पा गाठण्याची शक्यता आणखी मजबूत होईल. मात्र, कमाईचा आलेख जर घसरत राहिला तर हे लक्ष्य गाठण्यासाठी चित्रपटाला मोठी मेहनत घ्यावी लागू शकते

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us