Bigg Boss 20 : अवघ्या 5 महिन्यात बादशाहसोबतच्या नात्यात काय बिनसलं ? ईशा रिखीने सांगितलं नातं तुटण्यामागचं कारण
Bigg Boss 20 : रॅपर बादशाहचं वै.क्तिक आयुष्य बरंच चर्चेत आहे. त्याची पूर्व पत्नी ईशा रेखी सध्या 'बिग बॉस 20'मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. अनेकदा बादशाहचा विषय निघतो पण ती मोकळेपणे बोलू शकत नाही. त्या दोघांचं नातं तुटण्यामागचं कारण नुकतंच तिने सांगितलं.

Bigg Boss 20 : प्रसिद्ध गायक आणि रॅपर बादशाह आणि त्याची पूर्व पत्नी ईशा रिखीचं नातं गेल्या बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. अवघ्या 5 महिन्यांपूर्वी त्यांच्या लग्नाची बातमी समोर आली होती, मात्र हळहूळ त्यांच्यात काही बिनसल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या. काही दिवसांपूर्वीच दोघांनीही आपण वेगळे होत असल्याची अधिकृत घोषणा देखील केली, सध्या ईशार रिखी ‘बिग बॉस 20’ मध्ये स्पर्धक म्हणून आली आहे. मी आमच्या मोडलेल्या नात्यावर काही बोलणार नाही, असं तिने सुरूवातील स्पष्ट केलं खरं .. पण काही दिवसांनी ईशाने तिच्या घटस्फोटामागचं कारण स्पष्ट केलंय, ती खरंतर कनिकाला उदाहरण देऊन काही समजावत होती, पण नातं मोडण्यामागचं कारण बादशाह असल्याचं तिने बोलताना सांगितलं.
पंजाबी अभिनेत्री आणि ‘बिग बॉस 20’ स्पर्धक असलेल्या ईशा रिखीने तिचं नातं आणि लग्न याबद्दल अनेक हैराण करणारे खुलासे केलेत. त्या नात्यात असताना किती वेदना सहन कराव्या लागल्या, विश्वासघाताचा सामना करावा लागला ते ईशाने नमूद केलं. ‘मी जेव्हा त्या नात्यात होते, बाहेरून गोष्टी जशा दिसत होत्या, तेव्हा त्या तशा नव्हत्या, असं ती म्हणाली. मला खोट सांगण्यात आलं आणि मी बराच काळ टॉक्सि वातावरणात राहिले’ असंही ईशाने नमूद केलं.
बादशाहबद्दल काय म्हणाली ईशा ?
बिग बॉस 20 च्या नुकत्याच आलेल्या एपिसोडमध्ये ईशा आणि कनिका लग्नाबद्दल बोलताना दिसल्या. ईशा म्हणाली – ‘ कोणी जर मला येऊन सांगितलं की ईशा अशी आहे, तशी आहे. तर मी ती गोष्ट जोपर्यंत स्वत:च्या डोळ्यांनी पहात नाही, तोपर्यंत मी त्यावर विश्वास ठेवणार नाही. मी अशीच आहे. नात्यांच्या बाबतीही माझं असं वागण आहे. कोणी जर मला काहीही सांगितलं तर मी त्यांना सांगेन, एकतर मला पुरावा द्यास नाहीतर माझ्या मनाशी खेळण बंद करा.’ असं ईशा म्हणाली. एखाद्या नात्याबद्दल संशय येऊ शकतो, पण मी जोपर्यंत स्वत: ते पहात नाही, मी त्यावर विश्वास ठेवत नाही, असं तिने नमूद केलं.
जेव्हा एखादं नातं संपत, तेव्हा तुम्हाला कळतं की संपूर्ण काळ तुमचा विश्वासघात झाला. त्यावर कनिकाने तिला प्रश्न विचारला की, तुला शारीरिक, मानसिक की सोशल, कोणता विश्वासघात सहन करावा लागला ? त्यावर थोडं थांबून नंतर ईशाने उत्तर दिलं की – सगळ्या प्रकारचा ( विश्वासघात.).
बादशाहसोबतचं नातं टॉक्सिक ?
पुढे ईशा म्हणाली की : ‘ मध्ये अडकून पडणं खूप टॉक्सिक असतं. म्हणजे मी तुला खात्री देईन की तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस, मी तुझ्या बेस्ट फ्रेंडप्रमाणेच वागेन, सगळीकडे घेऊन जाईन. पण नंतर एक वेळ अशी येईल तेव्हा तुला समजेल की खरंतर तू कधीच माझी बेस्ट फ्रेंज नव्हतीस. त्याचप्रमाणे, एखाद्याची त्याच्या पार्टनरच्या संपूर्ण मित्रपरिवाराशी ओळख करून दिली जात नाही; फक्त काही निवडक आणि खास लोकांशीच त्यांची ओळख करून दिली जाते.’ असं तिने सांगितलं