AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कपिल शर्माच्या शोच्या नव्या सीझनची तारीख जाहीर; पहिला एपिसोड या दिवशी होणार रिलीज

कपिल शर्माच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’चा सीझन 5 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचबरोबर हा शो कुठे आणि कधी पाहता येणार याबाबत देखील माहिती समोर आली आहे.

कपिल शर्माच्या शोच्या नव्या सीझनची तारीख जाहीर; पहिला एपिसोड या दिवशी होणार रिलीज
Image Credit source: Social media
| Updated on: Sep 16, 2026 | 3:55 PM
Share

लोकप्रिय कॉमेडियन कपिल शर्मा पुन्हा एकदा आपल्या विनोदी अंदाजाने प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. कपिल शर्माच्या बहुप्रतीक्षित ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’च्या पाचव्या सीझनची घोषणा करण्यात आली आहे. या नव्या सीझनचा धमाकेदार अनाउन्समेंट व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून, चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

कपिल शर्माने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर या नव्या सीझनची माहिती दिली. ‘हंसी का त्योहार’ अशी या सीझनची थीम ठेवण्यात आली आहे. अनाउन्समेंट व्हिडीओमध्ये देशातील विविध सण साजरे करताना शोची संपूर्ण टीम दिसत आहे. नाच-गाणे आणि विनोदाची झलक असलेल्या या व्हिडीओला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

जुनी टीम पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’च्या पाचव्या सीझनमध्ये जुनी स्टारकास्ट पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. कपिल शर्मासोबत सुनील ग्रोव्हर, कृष्णा अभिषेक, कीकू शारदा, अर्चना पूरण सिंह आणि नवज्योत सिंह सिद्धू हे कलाकार दिसणार आहेत. त्यामुळे या सीझनमध्येही विनोदाची रंगत कायम राहणार असल्याचे दिसते.

कपिल शर्माने व्हिडीओ शेअर करताना लिहिले, ‘ढोल, नगाडा, सब बजेगा, क्योंकि हंसी का त्योहार अब नेटफ्लिक्स पर सजेगा.’ त्याने दिलेल्या माहितीनुसार, शोचा पाचवा सीझन 26 सप्टेंबरपासून रात्री 8 वाजता नेटफ्लिक्सवर सुरू होणार आहे.

चाहत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिक्रिया

अनाउन्समेंट व्हिडीओ समोर आल्यानंतर चाहत्यांनी कमेंट्सद्वारे आनंद व्यक्त केला आहे. अभिनेत्री रिद्धिमा कपूरनेही कपिलच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत त्याला प्रोत्साहन दिले. काही चाहत्यांनी नव्या सीझनची आतुरतेने वाट पाहत असल्याचे सांगितले, तर काहींनी शोमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

कपिल शर्माने आपल्या शोच्या पाचव्या सीझनबद्दल बोलताना सांगितले की, प्रत्येक सीझननंतर आपल्याला वाटते की खूप मजा केली आहे; मात्र त्यानंतर अजून बरेच काही करायचे बाकी असल्याची जाणीव होते. हीच भावना त्याला पुढे जाण्यास प्रेरणा देते.

View this post on Instagram

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

मोठ्या सेलिब्रिटींच्या उपस्थितीची उत्सुकता

दरवेळेप्रमाणे या सीझनमध्येही मनोरंजन क्षेत्रातील अनेक प्रसिद्ध कलाकार आणि सेलिब्रिटी पाहुणे म्हणून सहभागी होण्याची शक्यता आहे. मात्र, पाहुण्यांच्या नावांची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

Follow Us
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?