AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘धुरंधर’ पाहिलास का? 9 महिन्यांनंतर शाहरुख खान स्पष्टच बोलला..

आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' आणि 'धुरंधर: द रिव्हेंज' या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली आहे. धुरंधर पाहिलास का, असा प्रश्न विचारणाऱ्या युजरला आता शाहरुखने उत्तर दिलं आहे.

'धुरंधर' पाहिलास का? 9 महिन्यांनंतर शाहरुख खान स्पष्टच बोलला..
Ranveer Singh and Shah Rukh KhanImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 16, 2026 | 3:50 PM
Share

बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान याने अखेर रणवीर सिंहच्या चर्चेत असलेल्या ‘धुरंधर’ फ्रँचायझीबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हे दोन्ही चित्रपट पाहिल्याचं शाहरुखने सांगितले. एवढंच नाही, तर दोन्ही भाग आपल्याला आवडल्याचंही त्याने स्पष्ट केलं. शाहरुखची ही प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. शाहरुख खान नुकताच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर चाहत्यांसोबत ‘Ask SRK’ सेशनमध्ये संवाद साधताना दिसला. या सेशनमध्ये एका चाहत्याने शाहरुखला थेट प्रश्न विचारला, ‘तू ‘धुरंधर’ पाहिला आहे का?’ चाहत्याच्या या प्रश्नाला उत्तर देताना शाहरुखने लिहिलं, ‘दोन्ही भाग खूप आवडले.. संपूर्ण टीमद्वारे जबरदस्त काम झालं आहे.’ शाहरुखने दोन्ही भागांचा आनंद घेतल्याचं सांगत संपूर्ण टीमच्या कामाचं कौतुक केलं.

शाहरुख खानने रणवीर सिंहच्या अभिनयासह चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शक आणि संपूर्ण टीमच्या कामाची त्याने प्रशंसा केली आहे. ‘धुरंधर’ फ्रँचायझीमध्ये रणवीर सिंहने हमजा अली मझारी आणि जसकीरत सिंग रंगी अशी दुहेरी भूमिका साकारली आहे. पहिल्या भागात कथानकाची पार्श्वभूमी आणि मुख्य व्यक्तिरेखांची ओळख करून दिल्यानंतर दुसऱ्या भागात कथा पुढे नेण्यात आली. दोन्ही चित्रपटांचं लेखन आणि दिग्दर्शन आदित्य धरने केलं आहे.

या फ्रँचायझीमध्ये रणवीरसोबत अक्षय खन्ना, संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर. माधवन, सारा अर्जुन, राकेश बेदी यांसारख्या कलाकारांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे चित्रपटातील कलाकारांच्या कामगिरीचीही मोठी चर्चा झाली. ‘धुरंधर’च्या दोन्ही भागांना बॉक्स ऑफिसवर मोठा प्रतिसाद मिळाला. पहिल्या भागाने जगभरात मोठी कमाई केल्यानंतर ‘धुरंधर: द रिव्हेंज’नेही चांगली कामगिरी केली. या पार्श्वभूमीवर शाहरुख खानसारख्या मोठ्या स्टारने फ्रँचायझीचं कौतुक केल्यामुळे त्याची चर्चा आणखी वाढली आहे.

दरम्यान, शाहरुख खान स्वतः ‘किंग’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुखसोबत सुहाना खान, दीपिका पदुकोण, राणी मुखर्जी, अभिषेक बच्चन आणि अन्य कलाकार दिसणार आहेत. ‘किंग’ 24 डिसेंबर 2026 रोजी प्रदर्शित होणार असल्याची माहिती शाहरुखने चाहत्यांसोबतच्या संवादादरम्यान दिली आहे.

Follow Us
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?