Baseer Ali : तिची सर्व पापं माझ्या नशिबी…गर्लफ्रेंडची इस्लाम स्वीकारण्याची तयारी, धर्माच्या भीतीपोटी अभिनेत्यानं केला ब्रेकअप
Baseer Ali : टीव्ही रिॲलिटी शोमधून प्रसिद्धी मिळवलेल्या बसीर अलीनं अलीकडेच त्याच्या रिलेशनशिपबद्दल खुलासा केला आहे. त्याची गर्लफ्रेंड मुस्लिम नव्हती, मात्र ती अभिनेत्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारायला तयार होती.

‘बिग बॉस’ फेम बसीर अलीनं त्याच्या रिलेशनशिपबद्दल उघडपणे सांगितलं. अभिनेत्यानं खुलासा केला की, त्याची एक गर्लफ्रेंड त्याच्यासोबत राहण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारायलाही तयार होती, पण त्यानं ते नातं संपवण्याचा आणि तिच्याशी संबंध तोडण्याचा निर्णय घेतला, कारण ती इस्लामच्या सर्व नियमांचं पालन करू शकेल की नाही याची त्याला खात्री नव्हती.
‘फिल्म विंडो’ला दिलेल्या एका अलीकडील मुलाखतीत, बसीर अलीनं त्याच्या एक्स गर्लफ्रेंडबद्दल सांगितलं. इस्लाम धर्म स्वीकारण्याची तिची इच्छा असूनही, त्यांच्या ब्रेकअपचं कारणही त्यानं स्पष्ट केलं. बसीर म्हणाला, ‘मला कोणीतरी आवडलं, असे फार कमी प्रसंग आहेत. पण, ती मला खूप आवडायची. ती मुस्लिम नव्हती. मात्र, तिच्यासोबत काही भविष्य नाही, हे माझ्या लक्षात आलेलं.’
बसीर पुढे म्हणाला, ‘ती धर्मांतर करण्यासही तयार होती. तिनं अपवित्र इस्लाम स्वीकारला. पण, जर ती त्या क्षणापासून इस्लाम स्वीकारत नसेल, प्रार्थना करत नसेल, इस्लाम मान्य करत नसेल, त्याचे नियम आणि कायदे पाळत नसेल, तर तिची सर्व पापं माझ्या नशिबी आली असती, म्हणून मी तिच्यासोबत ब्रेकअप केला.’
बसीर अलीचा जन्म आणि शिक्षण
हैदराबादमध्ये जन्मलेल्या बसीरला त्याच्या आईनं एकटीनं वाढवलं. अभिनेत्यानं चिरेक इंटरनॅशनल, सेंट जोसेफ पब्लिक स्कूल आणि ग्लेनडेल अकादमी येथे आपले शालेय शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर हैदराबादमधील सेंट मेरी कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. लहानपणापासूनच खेळाची आवड असलेला बसीर नेहमीच फुटबॉल आणि बास्केटबॉल खेळायचा.
बसीरनं २०१७ मध्ये ‘एमटीव्ही रोडीज रायझिंग’मध्ये भाग घेऊन मनोरंजन क्षेत्रात प्रवेश केला. या शोचा तो उपविजेता ठरला. त्यानं ‘स्प्लिट्सव्हिला १०’ मध्ये भाग घेतला आणि नैना सिंगसोबत तो विजयी ठरला. २०१८ पर्यंत, बसीरनं केवळ एक स्पर्धक म्हणूनच नव्हे, तर एक सूत्रसंचालक म्हणूनही स्वतःला सिद्ध केलं. त्याच वर्षी, त्यानं ‘एस ऑफ स्पेस २’ मध्ये भाग घेतला.