
Bhabiji Ghar Par Hain! | अभिनेत्री शुभांगी अत्रे हिने ‘भाभीजी घर पर हैं’ मालिकेतून चाहत्यांना पोट धरुन हसवलं. आज शुभांगी मालिकेपासून दूर असली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. जवळपास 10 वर्ष शुभांगी हिने चाहत्यांच्या मनावर आणि छोट्या पडद्यावर राज्य केलं. आज मालिकेपासून दूर असली तरी, शुभांगी सोशल मीडियावर कामय सक्रिय असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायलर होत आहे. पण या फोटोंमध्ये शुभांगी एकटी नाही तर, तिच्या मुलीसोबत दिसत आहेत. शुभांगी हिची लेक आशी प्रचंड सुंदर दिसते…
जुनी अगुरी भाभी म्हणजे शुभांगी अत्रे हिला एक मुलगी आहे आणि तिचं नाव आशी असं आहे. अभिनेत्रीने पियूष याच्यासोबत लग्न केलं होतं. त्यानंतर शुभांगी हिने लेक आशी हिचं जगात स्वागत केलं. गेल्या वर्षीच अभिनेत्री नवऱ्यापासून विभक्त झाली होती… तर घटस्फोटाच्या नंतर शुभांगीच्या पतीने अखेरचा श्वास घेतला. आता शुभांगी हिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
शुभांगी हिची लेक आशी 19 वर्षांची असून परदेशात शिक्षण पूर्ण करत आहे. पण शुभांगी हिला पाहिल्यानंतर बिलकूल वाटत नाही की, तिची लेक 19 वर्षांची आहे… दोघींचे फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी अभिनेत्रीला ‘संतूर मम्मीचं’ टॅग केलं आहे. दोघांमध्ये फक्त थोडंफार अंतर आहे… असं देखील अनेकांनी म्हटलं आहे.
सांगायचं झालं तर, शुभांगी ‘भाभीजी घर पर है’ मालिकेच्या सीझन 2 पासून वेगळी झाली आहे. मालिकेतील तिची जागा आता अभिनेत्री शिल्पा शिंदे हिने घेतली आहे. दरम्यान झालेल्या एका मुलाखतीत, शुभांगी हिने मालिका सोडण्याचं मुख्य कारण सांगितलं होतं. जवळपास 1 वर्ष निर्मात्यांसोबत चर्चा सुरु होती. पण कोणताच निर्णय घेण्यात आला आहे… अशात लेक आशी हिने नवीन काहीतरी करण्यास प्रेरित केलं…
शुभांगी अत्रे आता मालिकेत नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.