
दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील प्रसिद्ध गणपती लालबागच्या राजाला 11 लाख रुपयांचे दान केले. त्यांनी स्वत: जाऊन हे पैसे दिले नाहीत तर आपली टीम पाठवून चेक प्रदान केला. लालबागचा राजा मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात त्यांनी चेक स्वीकारत पत्रकारांना पोझ दिली आहे. अमिताभ बच्चन यांनी दान केल्याची बातमी येताच सोशल मीडियावर युजर दिग्गज अभिनेत्यावर नाराज झालेले दिसले. चाहत्यांनी याक्षणी पंजाबला मदत करणे गरजेचे होते असे बोल लगावले आहेत.
लालबागचा राजाला 11 लाखाची दान करण्याच्या महानायक अमिताभ यांच्या या कृतीचे काहींनी कौतूक केले आहे. तर काही लोक नाराज देखील झाले आहेत. लोकांचे म्हणणे आहे की ही रक्कम पंजाबात आलेल्या विनाशकारी पुराशी लढत असलेल्या लोकांना मदत म्हणून उपयोगी पडली असते. लालबागच्या ट्रस्टींना या दान स्वरुपात मिळालेल्या धनादेशाला दुजोरा दिला आहे. त्यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
लालबागच्या मंडळाने अमिताभ बच्चन यांनी दिलेला 11 लाख रुपयांचा धनादेश स्वीकार करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या निर्णयावर युजरच्या मिळत्या जुळत्या प्रतिक्रीया दिलेल्या आहेत. काही जणांनी बच्चन यांच्या औदार्याची आणि श्रद्धेची तारीफ केलेली आहे. तर काहींनी सवाल केला की त्यांनी पंजाबातील पुरग्रस्तांना मदत केल्याचे कुठे दिसले नाही असा सवाल केला आहे.
येथे पोस्ट पाहा –
अनेक युजर्सनी टीप्पणी केली की,’ पंजाबासाठी काही केले असते तर जास्त आनंद झाला असता.’ तर काही युजर्सने याकडे इशारा केला की प्रसिद्ध हस्ती नेहमी धार्मिक कार्यासाठी दान देण्यात तत्पर असतात. परंतू नैसर्गिक संकटात कमीच पुढे येतात. अन्य एका युजरने म्हटले की, ‘पंजाबच्या मदतीच्या द्या, बाऊजी..देवाला मदत केल्याने काही नाही होणार.. माणसाची मदत करा.’ एका अन्य प्रतिक्रीयेत म्हटलेय की, ‘ जर पंजाबला दिले असते. एक किंवा दोन कुटुंबांना दत्तक घेतले असते,तर थेट गणपती बाप्पा पर्यंत तुमचा पैसा गेला असता.’
पंजाबात 1988 नंतर सर्वात मोठ्या पुरस्थितीशी झुंजत आहे, ज्यात 1,300 हून जास्त गावे जलमग्न झाली आहेत. सुरुवातीचा अंदाजानुसार शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.सुमारे 3 लाख एकर भात आणि अन्य पिके कापणी आधीच पाण्यात नष्ट झाली आहेत. बुधवारी राज्यात आणखी झालेल्या वृष्टीने संकटाची तीव्रता इतकी वाढली आहे. त्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्याही वाढली आहे.