
Amitabh Bachchan Vs Rekha Net Worth : हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठे स्टार असलेले बिग बी अर्थात अमिताभ बच्चन आणि बॉलिवूडची एव्हरग्रीन ब्युटी, रेखा, हे दोघे एकेकाळी त्यांच्या प्रेमसंबंधामुळे चित्रपटसृष्टीत चर्चेत होते. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आणि एकत्र असताना त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. मात्र नंतर ते दोघे वेगळेही झाले. त्यांची प्रेमकहाणी माहीत नाही असा इसम विरळाच असेल. त्यांच्या नात्याबद्दल बरीच चर्चा झाली. पण आज आपण त्यांच्या प्रेमकाहणीबद्दल नव्हे तर त्यांचं नेटवर्थ अर्थात संपत्तीबद्दल जाणून घेणार आहोत.
अमिताभ बच्चन 60 च्या दशकाच्या उत्तरार्धापासून बॉलिवूडमध्ये काम करत आहेत, तर रेखा यांनी 0७० च्या दशकात त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. दोन्ही दिग्गजांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत, ज्यामुळे त्यांना बरीच प्रसिद्धी आणि संपत्ती मिळाली आहे. दोघांकडे किती संपत्ती आहे आणि त्यापैकी सर्वात श्रीमंत कोण आहे? चला जाणून घेऊया.
रेखाचे नेटवर्थ
सर्वात आधी आपण अभिनेत्र रेखा हिच्या एकूण संपत्तीवर एक नजर टाकूया. 70 वर्षांच्या रेखा हिने बॉलिवूडच्या इतिहासातील महान अभिनेत्रींपैकी एक मानले जाते. तिने तिच्या कारकिर्दीत उमराव जान, खून भरी मांग, खूबसूरत, सिलसिला, फूल बने अंगारे, मुकद्दर का सिंदर आणि मिस्टर नटवरलाल यासह अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे.
खरंतर रेखा आता बऱ्याच काळापासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे, पण ती आलिशान जीवन जगते. रोल्स-रॉइस घोस्ट, ऑडी ए8, मर्सिडीज-बेंझ एस-क्लास आणि बीएमडब्ल्यू आय7 इलेक्ट्रिक कारची मालक असलेल्या रेखा यांच्याकडे मुंबईतील बँड स्टँडमध्ये 100 कोटी रुपयांचा बंगला देखील आहे. तिचं एकूण नेटवर्थ 332 कोटी रुपये असल्याचं समजतं.
अमिताभ बच्चन यांचं नेटवर्थ
“शतकाचे महानायक” अमिताभ बच्चन यांनी संपत्तीच्या बाबतीत रेखा यांना मागे टाकले आहे. रेखा बिग बींच्या एकूण संपत्तीच्या जवळपासही नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बिग बींची एकूण संपत्ती अंदाजे 3400 कोटी रुपये आहे. ते फक्त चित्रपटांतच नव्हे तर ब्रँड एंडोर्समेंट, कौन बनेगा करोडपती शो आणि गुंतवणुकीतूनही मोठी कमाई करतात. बिग बी यांच्याकडे रोल्स-रॉइस फॅंटम, पोर्श केमन एस आणि मर्सिडीज-मेबॅक एस560 सारख्या महागड्या गाड्या देखील आहेत. तसेच मुंबईत त्यांचे जलसा, जनक आणि वत्स नावाचे कोट्यवधी रुपयांचे बंगले आहेत.