AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amitabh Bachchan : KBC च्या मंचावर अमिताभ बच्चन यांनी सांगितली मनातील भन्नाट इच्छा; जया बच्चन यांच्याबद्दल काय म्हणाले बिग बी?

कौन बनेगा करोड़पति शोमध्ये अमिताभ बच्चन यांनी पत्नी जया बच्चन यांनी आपल्याला ‘साहेब’ म्हणावे अशी मजेदार इच्छा व्यक्त केली. एका स्पर्धकाकडून प्रेरणा घेत बिग बींनी हा खुलासा केला. अमिताभ आणि जया बच्चन हे दोघे बॉलिवूडमधील सर्वात प्रतिष्ठित जोडप्यांपैकी एक आहेत.

Amitabh Bachchan : KBC च्या मंचावर अमिताभ बच्चन यांनी सांगितली मनातील भन्नाट इच्छा; जया बच्चन यांच्याबद्दल काय म्हणाले बिग बी?
| Updated on: Oct 15, 2026 | 6:51 PM
Share

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे सध्या ‘कौन बनेगा करोड़पति’ या रिॲलिटी क्विझ शो च्या होस्टिंगमध्ये व्यस्त आहेत. सध्या या शोचा 18 वा सीझन सुरू आहे. या शोच्या एका भागात बिग बी यांनी मजेदार अंदाजात त्यांच्या मनातील इच्छा व्यक्त केली. त्यांची पत्नी आणि अभिनेत्री जया बच्चन यांनीही आपल्याला, ‘साहेब’ अशी हाक मारावी, अशी इच्छा असल्याचं बिग बी म्हणाले. ते ऐकून सगळेच आश्चर्यचकित झाले. “आज तुम्ही तुमच्यासोबत कोणाला घेऊन आला आहात ?” असा सवाल बिग बी यांनी केबीसीमध्ये एका स्पर्धकाला विचारला. ते ऐकून ती स्पर्धक म्हणाली, की तिच्यासोबत तिच्या सासूबाई आणि 10 वर्षांचा मुलगा आला आहे. ” खरंतर साहेब ( पती) सुद्धा येणार होते, त्यांची इच्छा होती, पण काही कामामुळे ते येऊ शकले नाही” असं ती महिला पुढे म्हणाली.

काय म्हणाले अमिताभ ?

त्या महिलेच्या तोंडून ‘साहेब’ हा शब्द ऐकताच मेगास्टार अमिताभ बच्चन यांना उत्सुकता वाटली आणि त्यांनी विचारलं, “साहेब कोण आहेत?” यावर स्पर्धक महिलेने सांगितलं की, ती तिचे पती राहुल यांना प्रेमाने ‘साहेब’ असं म्हणते. हे ऐकून अमिताभ बच्चन हसत म्हणाले, “तुम्ही त्यांना साहेब म्हणता?” . नंतर त्यावर प्रतिक्रिया देताना बिग बी म्हणाले की, तेही या स्पर्धक महिलेकडून प्रेरणा घेतील आणि पत्नी जया बच्चन यांनाही त्यांना अशाच प्रकारे हाक मारायला सांगतील.पुढे अमिताभ बच्चन मिश्कीलपणे म्हणाले, “ आज रात्री घरी गेल्यावर मी जया जींना सांगणार आहे की, तुम्हीही आम्हाला ‘साहेब’ म्हणत जा. आम्हाला खूप छान वाटेल!” . त्यांचं हे बोलणं ऐकून उपस्थित सर्वांनाच हसू फुटलं.

सांगायचं झालं तर अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे दोघं, भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात चर्चित आणि लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. 1970 साली पुण्याच्या ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’मध्ये ते दोघे भेटले होते. त्यानंतर ‘गुड्डी’ फिल्मच्या सेटवर त्यांची परत भेट झाली. ‘जंजीर’ चित्रपटाचं शूटिंग करताना ते एकमेकांच्या जवळ आले. दोघांनी ठरवलं की जर ‘जंजीर’ हिट झाली, तर ते एकत्र लंडनला फेरफटका मारायला जातील. जेव्हा अमिताभ यांनी ही गोष्ट आपल्या वडिलांनं डॉ. हरिवंश राय बच्चन यांना सांगितली, तेव्हां त्यांनी म्हटलं की जर जया सोबत जाणार असतील, तर आधी लग्न करावं. अशाप्रकारे 3 जून 1973 साली त्या दोघांचं लग्न झालं. लग्नानंतर जया बच्चन चित्रपटांपासून काही काळ दूर होत्या तर अमिताभ यांची कारकीर्द खूप उंचावली आणि अनेक चित्रपटांमधील भूमिकेमुळे ‘अँग्री यंग मॅन’ म्हणून समोर आले.

Follow Us
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते?
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते? कोर्टातील सुनावणीत मोठा ट्विस्ट
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून...
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून... थेट बजावली नोटीस
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावर राजकारण, अखेर बच्चू कडू...
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावरून राजकारण, अखेर बच्चू कडूंची मोठी प्रतिक्रिया समोर